ETV Bharat / state

उल्हासनगर इमारत दुर्घटना : मंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री घटनास्थळी भेट; आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू - ulhasnagar builiding collapsed news

उल्हासनगर शहरात निकृष्ट बांधकाम झालेल्या इमारतींचे स्लॅब कोसळून दरवर्षी अनेकांचा बळी जातो. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या १० वर्षात ३४ इमारतींचे स्लॅब कोसळून ४०पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. काल रात्रीही उल्हासनगर २मधील नेहरू चौक, येथे साई शक्ती या पाच मजली इमारतीमध्ये दहा वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली.

Eknath shinde
मंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : May 29, 2021, 8:23 AM IST

Updated : May 29, 2021, 9:56 AM IST

ठाणे - उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात १९९२ ते ९५दरम्यान रेतीवर बंदी असताना दगडाचा बारीक चुरा व वालवा रेतीपासून असंख्य इमारती उभारण्यात आल्या. त्याच इमारती काही वर्षांपूर्वी इमारती धोकादायक ठरवून महापालिकेने केवळ स्लॅब कटींग करीत कारवाई केली होती. त्यांनतर काही बांधकाम विकासकांनी त्या इमारतीचे पुन्हा स्लॅब भरून नागरिकांना सदनिका विक्री केल्या. आता त्याच नागरिकांच्या जीवावर उठल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले. काल (शुक्रवारी) रात्री झालेल्या इमारत दुर्घटनेत ७ जणांचा बळी गेला असून अशा इमारती उभारणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेतही दिले आहे.

याबाबत बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

३४ इमारतींचे स्लॅब कोसळून ४० पेक्षा जास्त जणांचा बळी ..

उल्हासनगर शहरात निकृष्ट बांधकाम झालेल्या इमारतींचे स्लॅब कोसळून दरवर्षी अनेकांचा बळी जातो. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या १० वर्षात ३४ इमारतींचे स्लॅब कोसळून ४०पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. काल रात्रीही उल्हासनगर २मधील नेहरू चौक, येथे साई शक्ती या पाच मजली इमारतीमध्ये दहा वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. पाचव्या मजल्यावरील एका सदनिकेचा पाचव्या मजल्यापासून पहिल्या मजल्या पर्यंतचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला आहे. घटनेची माहिती कळताच ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी काही प्रमाणात ढिगारा हटविला असून त्यातून सात जणांचे मृतदेह बाहेर काढले. या इमारतीमध्ये पाच मजले (तळ+5) आहेत.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह उपस्थित आहेत. सुरुवातीला ५ व्यक्तींचे मृतदेह सापडले होते. तर ३ ते ४ व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. उल्हासनगर अग्निशामक केंद्राकडून बचावकार्य सुरू आहे. सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी असून जखमींना उपचारासाठी नेण्यात येत आहे.

हेही वाचा - जालना : रुग्णालयात तरुणाला मारहाण प्रकरणी पाच पोलीस निलंबित, पोलीस अधीक्षकांची कारवाई

१५ दिवसापूर्वी इमारतींचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू -

उल्हासनगरात १५ दिवसांपूर्वी मोहिनी इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला होता. १० जण जखमी झाले होते. त्यानंतर दोन दिवसांत पुन्हा दोन इमारतीचे स्लॅब व प्लॅस्टर पडल्याने, इमारती सील केल्या आहेत. इमारत पडल्याची घटना नवीन असताना कॅम्प नं-२ परिसरातील साई शक्ती इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. स्लॅबचा ढिगारा काढण्यात येत असून आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह काढण्यात आले. इमारतीमध्ये एकून २९ फ्लॅट असून यातील रहिवाशांची राहण्याची व्यवस्था थारासिंग दरबार येथे करण्यात येत आहे. परिसरात वीजपुरवठा खंडीत झाल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाचे जवान, पोलीस व महापालिका कर्मचारी नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे.

मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीने प्रयत्न -

इमारत दुर्घटनेत बळी गेलेल्या नागरिकांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. इमारत अधिकृत असो वा अनधिकृत हे पाहणे आताच्या घडीला महत्त्वाचे नसून दुर्घटनेतील नागरिकांना मदत करण्याचे आहे. त्यामुळे लवकरच त्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांनी मध्यरात्री १वाजता घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.

जखमी व्यक्तीचे नावे खालीलप्रमाणे -

१) अलगोत नायडर (पु/ वय ६० वर्ष)
२) नाव माहीत नाही

मृत व्यक्तीचे नाव खालीलप्रमाणे -

१) पुनीत बजोमल चांदवाणी (पु/वय १७ वर्ष)
२) दिनेश बजोमल चांदवाणी (पु/वय ४० वर्ष)
३) दीपक बजोमल चांदवाणी (पु/वय ४२ वर्ष)
४) मोहिनी बजोमल चांदवाणी (स्त्री /वय ६५ वर्ष)
५) कृष्णा इनूचंद बजाज (पु/वय २४ वर्ष)
६) अमृता इनूचंद बजाज (स्त्री /वय ५४ वर्ष)
७) लवली बजाज

हेही वाचा - पतंजलीच्या मोहरी खाद्यतेलात भेसळीची तक्रार; राजस्थानातील कारखाना सील

Last Updated : May 29, 2021, 9:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.