ETV Bharat / state

'इडापिडा टळो, कोरोना व्हायरस होळीत जळो' - कोरोना व्हायरस होळीत जळून जावो

महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने कोरोना व्हायरस होळीत जळून जाईल, असे शहर विकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आजींचा सत्कार करताना मंत्री शिंदे
आजींचा सत्कार करताना मंत्री शिंदे
author img

By

Published : Mar 10, 2020, 12:00 AM IST

ठाणे - इडापिडा टळो आणि कोरोना व्हायरस होळीत जळून जावो, अशा अनोख्या शुभेच्छा आज ठाण्याचे पालकमंत्री तथा शहर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त ठाणेकरांना दिल्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत, ठाण्याच्या वयोवृद्ध अशा विठाबाई पाटील या 109 वर्षीय आजींचा त्यांनी जाहीर सत्कार केला. कोरोना व्हायरसमुळे होळीच्या सणावर भीतीचे सावट असले तरी, महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने कोरोना व्हायरस होळीत जळून जाईल, असे ते म्हणाले.

'इडापिडा टळो, कोरोना व्हायरस होळीत जळो'

महाराष्ट्रात अजूनतरी या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला नसला तरी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास महाविकासआघाडी सज्ज असल्याचे मंत्री शिंदे सांगितले. सर्व मोठ्या सरकारी रुग्णालयात या व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांसाठी बेड आरक्षित ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. तोंडाच्या मास्कचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणार असल्याचे सूतोवाच करत, नागरिकांनी त्रास होताच डॉक्टरकडे धाव घ्यावी, अशी सूचना केली.

हेही वाचा - देशावर 50 वर्षे राज्य करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होतंय... मग फक्त आम्हालाच प्रश्न का ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.