मुंबई : ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पाच्या पहिल्या भागातील ( Mh Mumbai Special Traffic Block ) उन्नत मार्गामधील मुंब्रा शिळफाटादरम्यान, राज्यमहामार्ग क्रमांक ४ ओलांडण्यासाठी ( Erected to Cross State Highway No. 4 ) ६३ मीटर लांबीचे स्टीलचे ८ गर्डर उभारण्यात येणार ( 8 Steel Girders of 63 M Length ) आहेत. या गर्डरच्या ( Special Traffic Block For Elevated Road Near Thane ) उभारणीसाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला ( Due to Girder Emergency on State Highway ) आहे. हा पूल पूर्णतः उन्नत असून, भारत बिजलीजवळ या भागात उड्डाणपुलाची उंची साधारणतः जमिनीपासून १५ मीटर इतकी असेल.
८ गर्डरचे एकूण वजन अंदाजित ६५० मेट्रिक टन : तसेच सदर ८ गर्डरचे एकूण वजन अंदाजित ६५० मेट्रिक टन इतके आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पाचे काम विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेले असून, या प्रकल्पाची लांबी १२.३ किमी इतकी आहे. तसेच, हा प्रकल्प ३ भागांत प्रगतिपथावर आहे.
या गर्डरच्या कामाचे स्वरूप : उपरोक्त कामासाठी पहिल्या ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान एकूण ४ गर्डर, तर दुसऱ्या ब्लॉकमध्ये उर्वरित ४ अशा प्रकारे एकूण ८ गर्डर उभारले जाणार आहेत. सदर कामामध्ये क्रेनच्या साहाय्याने २ गर्डर एकाचवेळी उचलले जातील. या दोन गर्डरचे एकत्रित वजन सुमारे १६० ते १९० मेट्रिक टन इतके असेल. सदर गर्डर उभारणीसाठी A-७५० टन क्षमतेच्या क्रॉलर क्रेन वापरण्यात, तसेच डायाफ्राम जोडणीसाठी २ अतिरिक्त क्रेन वापरल्या जातील.
गर्डर उभारणीसाठी घेण्यात येणार २ ट्रॅफिक ब्लॉक : पहिला ब्लॉक दि. १८ डिसेंबर २०२२ च्या रात्री ००:०१ वा. पासून २३:५९ वा. पर्यंत असणार आहे, तर दुसरा २५ डिसेंबर २०२२, ००:०१ वा. पासून २३:५९ वा. पर्यंत असणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महामार्ग क्र. ४ वर मुंब्रा शिळफाटा दरम्यानची अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, ती इतर पर्यायी मार्गांनी वळविली जाईल. तसेच, मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपूलदेखील वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार असून, इतर वाहतूक उड्डाणपुला खालून सुरू ठेवण्यात येईल.
ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा : याबाबत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री. एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी ई-टीव्हीसोबत बातचीत करताना माहिती दिली की, "ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पातील हा अवघड आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या गर्डरची उभारणी पूर्ण झाल्यावर प्रकल्पाचे बरेच काम पूर्ण होईल. या पुलामुळे मुंबई ते ठाणे गर्दी कमी होईल. तसेच, पारसिक बोगद्याचे कामसुद्धा प्रगतिपथावर असून, त्याचे काम ६६ टक्के पूर्ण झालं आहे."