ETV Bharat / state

औषध देण्यास नकार दिल्याच्या वादातून नशेखोरांकडून मेडिकलची तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद - Medical vandalism in kalyan

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देण्यास मेडिकल चालकाने नकार दिल्याच्या वादातून 2 नशेखोर तरुणांनी मेडिकलची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. तसेच गल्ल्यातील रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना बल्याणी गावातील वेलकम मेडिकलमध्ये घडली आहे.

cctv
मेडिकलची तोडफोड करतानाचा सीसीटीव्ही
author img

By

Published : Mar 5, 2022, 3:04 PM IST

Updated : Mar 5, 2022, 5:11 PM IST

ठाणे - डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देण्यास मेडिकल चालकाने नकार दिल्याच्या वादातून 2 नशेखोर तरुणांनी मेडिकलची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. तसेच गल्ल्यातील रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना बल्याणी गावातील वेलकम मेडिकलमध्ये घडली आहे. नशेखोरांच्या तोडफोडीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गल्ल्यातून पळवलेली 12 हजाराची रोकडही हस्तगत केली आहे. सुंदरम सुरेश राऊत (वय 30 वर्षे ) शेहजाद शब्बीर शेख (वय 25 वर्षे ) असे अटक हल्लेखोरांची नावे आहेत.

मेडिकलची तोडफोड करतानाचा सीसीटीव्ही

कोरेक्स औषधची मागितली बाटली-

प्रकाश प्रजापती (वय 39 वर्षे रा. बनेली) यांचे बल्याणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वेलकम नावाने मेडिकल आहे. या मेडिकलमध्ये 3 मार्चला रात्री 09:30 वाजताच्या सुमारास नशेखोर सुंदरम, शेहजाद हे दोघे आले होते. त्यावेळी दोघांनी कोरेक्स औषधाची बाटली मागितली होती. मात्र, मेडिकल चालक प्रजापती यांनी डॉक्टरच्या चिठ्ठी शिवाय कोरेक्स औषध देऊ शकत नाही. असे बोलताच दोघांनी मेडिकलची मोठया प्रमाणात तोडफोड केली. शिवाय गल्ल्यातील 12 हजार रुपयांची रोकड घेऊन पळून गेले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोघांनाही बल्याणी परिसरातून अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी दिली.

Last Updated : Mar 5, 2022, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.