ठाणे - बुधवारी (आज) सकाळपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाने ठाणे शहरात अनेक भागात पाणी साचले होते. पाणी साचू नये यासाठी सूचना देवूनही प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे झालेल्या पावसात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. ही बाब निदर्शनास येताच महापौर नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना धारेधर धरले. संपूर्ण पावसाळाभर आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्याबाबतचे निर्देश दिले.
हेही वाचा -कौतुकास्पद! नाशिक जिल्ह्यातील कौटखेडा गाव कोरोनामुक्तच