ETV Bharat / state

भिवंडीत एकाच वेळी दोन ठिकाणी भीषण आग; लाखोंचे नुकसान - भिवंडी अग्निशामक दल

भिवंडी तालुक्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या. यामध्ये वळपाडा आणि नारपोली या ठिकाणी या आगीच्या घटना घडल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन्ही ठिकाणची आग आटोक्यात आणली आहे. या घटनेेत लाखोंचे नुकसान झाले आहे.

massive fire broke out
भिवंडीत एकाच वेळी दोन ठिकाणी भीषण आग
author img

By

Published : Oct 4, 2020, 7:23 AM IST

ठाणे - ज्यालामुखीचा तालुका म्हणून ओळख निर्माण करण्याऱ्या भिवंडी तालुक्यात पुन्हा भीषण अग्नी तांडव घडल्याचे पाहवयास मिळाले आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी दोन ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटनेने अग्निशमन दलाच्या जवानांमध्ये तारांबळ उडून खळबळ उडाली आहे. या दोन्ही ठिकाणच्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. वळपाडा आणि नारपोली या ठिकाणी या आगीच्या घटना घडल्या आहेत.

भिवंडीत एकाच वेळी दोन ठिकाणी भीषण आग

आगीच्या पहिल्या घटनेत भिवंडी तालुक्यातील वळपाडा ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्स मधील प्लास्टिक बोर्ड आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य असलेल्या गोदामांना शनिवारी रात्री उशिरा अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यलयात मिळताच घटनास्थळी 2 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवत होत्या. त्याचवेळी भिवंडीतील नारपोली गावातील मारू कंपाउंडमध्ये एक तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कपड्यासाठी धागे तयार करणाऱ्या वारपीन करखान्याला भीषण आग लागली.

नारपोली येथील आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दोन्ही ठिकाणच्या आगीने रुद्ररूप धारण केले होते त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. सध्या दोन्ही ठिकाणी कुलिंगचे काम सुरू असून या दोन्ही ठिकाणी लागलेल्या भीषण आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. तसेच दोन्ही आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कार्यलयातुन देण्यात आली आहे. मात्र पहिल्या घटनेतील आगीत लाखोंचे प्लास्टिक बोर्ड आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. तर दुसऱ्या घटनेतील आगीत कच्या कपड्याचा माल व धागेसह संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे.

अनलॉकमुळे भिवंडीतील सर्वच गोदामेसह हजारो कारखाने सुरू करण्यात आले आहेत. त्यातच गेल्या महिन्याभरात लहान मोठ्या आगीच्या १० ते ११ घटना भिवंडी शहरासह तालुक्यात घडल्या आहेत. त्याच रात्री उशिरा पुन्हा दोन ठिकाणी भीषण आगी लागल्याने या आगी विम्यासाठी लावल्या जातात, की अपघाताने लागतात? असा प्रश्न भिवंडीकरांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.