ETV Bharat / state

Fire In Company : अंबरनाथ एमआयडीसीतील फोम कंपनीला भीषण आग; तीन तासानंतर आटोक्यात

अंबरनाथ शहरातील फोम आणि जीन्सचे कपड बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. वेल्डिंगची ठिणगी फोमवर पडून आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

fire in ambernath badlapur midc
फोम कंपनीला भीषण आग
author img

By

Published : Jul 12, 2023, 10:16 PM IST

अंबरनाथ एमआयडीसीतील फोम कंपनीला भीषण आग

ठाणे : अंबरनाथ शहरातील आनंदनगर भागातील एमआयडीसी परिसरातील दशमेश नावाच्या फोम तयार करणाऱ्या कंपनीला, आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. ही भीषण आग इतकी भयानक होती की, आगीचे धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते. घटनास्थळी सहा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. तर तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

अशी लागली आग : अंबरनाथ शहरातील आनंदनगर भागात असलेल्या एमआयडीसीत दशमेश नावाची फोम ( गाद्या ) तयार करणारी कंपनी आहे. कामा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, आगीची घटना घडली तेव्हा कंपनीत वेल्डिंगचे काम सुरू होते. याच वेल्डिंगची ठिणगी फोमवर पडून आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात फोम असल्याने ही आग काही क्षणातच सर्वत्र कंपनीत पसरली. त्यावेळी कंपनीत असलेल्या कामगारांनी जीवाच्या भीतीने बाहेर पळ काढण्याने ते बचावले आहे.

घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू : या आगीची माहिती मिळाल्यानंतर अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या ६ ते ७ गाड्यासह पाण्याचे टॅंकर दाखल झाले. तर गेल्या तीन तासापासून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू होते. आता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून, सद्या घाटनास्थळी कुलिंगचे काम सुरु आहे.

कंपनी पूर्णपणे जळून खाक : ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समोर आले नाही. या आगीच्या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत. तसेच सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक अग्निशमन दालच्या मदतीला आहेत. मात्र या भीषण आगीत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाल्याने, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा -

  1. Solapur Textile Factory Blast: सोलापूर टेक्सटाईल कारखान्यात पहाटे भीषण स्फोट; तीन कामगारांचा भाजून मृत्यू
  2. Hyderabad: हैदराबादच्या वनस्थलीपुरममधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग
  3. Coaching Center Fire Delhi: दिल्लीतील मुखर्जी नगरमधील कोचिंग सेंटरला भीषण आग, विद्यार्थ्यांनी खिडकीतून मारल्या उड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.