ठाणे Man Murder Case: ५२ वर्षीय विहीण ही ६४ वर्षीय व्याही सोबत लॉजवर मुक्कामासाठी आली. त्यावेळी दोघांमध्ये संपत्तीचा वाद निर्माण होऊन विहीणीने व्याहीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण-भिवंडी मार्गावरील पिंपळासघर गावच्या हद्दीत असलेल्या कॉस्मो लॉजमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून विहीणीला पोलिसांनी अटक केली आहे. (property dispute)
तिने केली पळण्याची तयारी, मॅनेजरला आला संशय: पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि मृतक नात्याने विहीण-व्याही असून या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्यानं ते दोघेही मुक्कामासाठी १३ जानेवारी रोजी रात्री १० वाजल्याच्या सुमारास कल्याण-भिवंडी मार्गावरील पिंपळासघर गावच्या हद्दीत असलेल्या कॉस्मो लॉजमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी या लॉजमधील पाहिल्या मजल्यावरील रूम बुक केली. त्यानंतर दोघेही लॉजच्या रुममध्ये असताना दोघांमध्ये संपत्तीचा वाद निर्माण झाला. मात्र, हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपी विहीणने व्याहीवर हल्ला करून त्याला जागीच ठार मारले. त्यानंतर १४ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजल्याच्या सुमारास लॉजच्या खोलीतून महिला पळून जाण्याच्या इराद्याने बाहेर आली आणि येथील मॅनेजर आणि कामगारांना सांगू लागली की, तो झोपला आहे. मात्र, मॅनेजरला संशय आल्याने तिला लॉजमध्येच खाली थांबवले आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
महिले विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल: घटनेची माहिती कोनगाव पोलीस पथकाला मिळताच पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर लॉज मॅनेजर रवींद्र शेट्टी (वय ४९) यांच्या तक्रारी वरून भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून महिलेला ताब्यात घेऊन अटक केली. आज आरोपी महिलेला भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता १८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीप बने यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपासही दीप बने करीत आहेत.
हेही वाचा: