ETV Bharat / state

Man killed by Father : जमिनीच्या वादातून बापाने केली मुलाची निर्घृण हत्या, हत्येप्रकरणी सख्या बापलेकांना अटक - मुलाची निर्घृण हत्या

बापाने मुलाच्या मदतीने आपल्याच मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कशिवली या गावात घडला आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी बापलेकाला अटक केली आहे. कचरू गोविंद पाटील व गणेश कचरू पाटील, अशी अटक केलेल्या वडील व भावाची नावे आहेत. तर काशिनाथ कचरू पाटील (वय 55 वर्षे), असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.

न
author img

By

Published : Mar 7, 2022, 10:15 PM IST

ठाणे - बापाने मुलाच्या मदतीने आपल्याच मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कशिवली या गावात घडला आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी बापलेकाला अटक केली आहे. कचरू गोविंद पाटील व गणेश कचरू पाटील, अशी अटक केलेल्या वडील व भावाची नावे आहेत. तर काशिनाथ कचरू पाटील (वय 55 वर्षे), असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.

शेतावरच कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या - भिवंडी तालुक्यातील धामणगाव कशिवली या गावात मृत काशिनाथ पाटील व त्याचे वडील कचरू पाटील व भाऊ गणेश यांच्यात मागील वर्षभरापासून जमिनीच्या वाटणी वरून वाद सुरू होता. त्यातच मृत काशीनाथ पाटील व त्यांचा मुलगा धनंजय, हे रविवारी (दि. 6 मार्च) शेतावर जळणासाठी लाकूडफाटा जमा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात काशीनाथ यांचे वडील कचरू व भाऊ गणेश याठिकाणी येऊन यापूर्वी तू जीवानिशी वाचला पण आता नाही वाचू शकणार, असे सांगत शिवीगाळ करत मारहाणीस सुरुवात केली. त्यानंतर आरोपी गणेश याने पुतण्या धनंजय याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. त्यावेळी वडील काशीनाथ मुलाच्या बचावासाठी पुढे आले असता कचरू यांनी कुऱ्हाडीने काशिनाथच्या डोक्यावर वार केला. यात काशिनाथ गंभीर जखमी झाले. त्यानंतर कचरू व गणेश दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. हल्ल्यानंतर काशिनाथ यांचा मुलगा धनंजयने गंभीर अवस्थेत वडिलांना रुग्णालयात दाखल केले असता येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा - Criminal Arrested Ulhasnagar : पत्नीच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी 22 वर्षानंतर गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.