ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या तोंडात कोंबल्या डांबरगोळ्या; पती गजाआड - चारित्र्याचा संशय

भिवंडीमध्ये चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या तोंडात डांबर गोळ्यांचा चुरा टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आरोपी पती फिरोज खान (वय-३०) याला अटक केली आहे.

husband arrested
पती गजाआड
author img

By

Published : Feb 14, 2020, 7:45 PM IST

ठाणे - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने जबरदस्ती तिच्या तोंडात डांबर गोळ्यांचा चुरा टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे ही घटना घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी फिरोज खान (वय-३०) याला अटक केली आहे.

भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे अबू बकर यांच्या खोलीत आरोपी फिरोज हा पत्नीसह राहतो. मागील काही दिवसांपासून फिरोज हा पत्नीच्या चारित्र्यवर संशय घेत असल्याने त्यांचे सतत वाद होत होते. गुरुवारी रात्री फिरोज दारू पिऊन घरी आला आल्याने पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. या भांडणादरम्यान त्याने पत्नीला बेदम मारहाण करीत तिच्या तोंडात डांबरगोळ्याचा चुरा टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - आज मी का मरत आहे ? महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राने खळबळ

शेजाऱ्यांनी पीडितेला तत्काळ जवळच्या स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलसांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी फिरोज याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.