ETV Bharat / state

Thane Crime News : रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून 70 लाखांना लुटले! महिलेसह एकाला अटक

रेल्वेते नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला 70 लाखांना लुटल्याची घटना ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक महिला व तिच्या साथीदाराला अटक केली आहे.

Thane Crime News
नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक
author img

By

Published : Jun 11, 2023, 7:31 PM IST

दिलीप फुलपगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

ठाणे : जिल्ह्यात एक महिला व तिच्या साथीदाराने रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका तरुणाची 70 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी महिला व तिच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. श्रद्धा उर्फ जानवी चौघुले (वय, 27 रा. शिवाजी चौक, कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर दीपक महाजन (वय, 26, रा. उल्हासनगर ) तिच्या साथीदाराचे नाव आहे.

दोन वर्षांत 70 लाख रुपये ट्रान्सफर केले : तक्रारदार अक्षय लोहार (26) हा उल्हासनगर कॅम्प नंबर एक परिसरात कुटुंबासह राहतो. तो नोकरीच्या शोधात होता. त्याची दीपक याच्याशी 2021 मध्ये ओळख झाली होती. ओळखीनंतर आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराने त्याला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. याला बळी पडून अक्षयने 2021 ते जून 2023 दरम्यान त्याच्या बँकेतून 69 लाख 78 हजार रुपयांची रक्कम आरोपींच्या खात्यात ट्रान्सफर केली.

दोन्ही आरोपींना अटक : विशेष म्हणजे आरोपी महिलेने अक्षयला बनावट रेल्वेचे शिक्के बनवून जॉयनिंग लेटरही दिले होते. हे लेटर खरे असल्याचे भासवून आतापर्यंत त्याच्याकडून 70 लाख रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अक्षयने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी भादंवि कलम 420, 406, 465, 468, 471, 473, 34 अन्वये महिला व तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोघांचाही शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

मोठे रॅकेट असल्याचा संशय : या दोघांनी मिळून आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? याचा मास्टर माईंड कोण आहे? तसेच यांनी रेल्वेचे नकली लेटर पॅड आणि शिक्के कसे बनवले? आणि ते कुठून आणले याचा तपास पोलीस करत आहेत. हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस तपास त्या दृष्टीने करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Sim Card Scam: तुमच्या दस्तावेजावर काढलेल्या सिमकार्डवरून घडू शकतो गुन्हा; जाणून घ्या सविस्तर...
  2. Beed Crime News: महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी; चोरट्यांनी मारला साडेबारा लाखावर डल्ला
  3. Robbery In Ludhiana : लुधियानात 10 कोटी रुपयांचा दरोडा! दरोडेखोर कॅश व्हॅन घेऊन फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.