ETV Bharat / state

दुर्मिळ 'इंडियन स्टार' कासवाची विक्री करणाऱ्या एकाला अटक; ठाणे वनविभागाची कारवाई - ठाणे वनविभाग

मासे आणि पक्षी विक्री करणाऱ्या दुकानात 'इंडियन स्टार' या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची विक्री करणाऱ्या शिवा मुतुरामलिंगम नाडार(वय 32 रा. मानपाडा) याला ठाणे वनविभागाने अटक केली आहे. दुकान मालक नाडार याने काउंटरच्या खाली प्लास्टिक बादलीत चार दुर्मिळ जिवंत कासव विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले होते.

दुर्मिळ 'इंडियन स्टार' कासवाची विक्री करणाऱ्या एकाला अटक
author img

By

Published : Oct 17, 2019, 5:50 AM IST

ठाणे - 'बालाजी अक्वेरीयम'(शॉप नं ६, वसंत विहार) या मासे आणि पक्षी विक्री करणाऱ्या दुकानात 'इंडियन स्टार' या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची विक्री होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाण्यातील वनक्षेत्रपाल यांच्या पथकाने छापेमारी करत चार दुर्मिळ जिवंत कासव हस्तगत केले आहेत. याप्रकरणी आरोपी शिवा मुतुरामलिंगम नाडार(वय 32 रा. मानपाडा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - लोणावळ्यात आढळला १२ फूट लांब अजगर; पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात केली रवानगी

वनविभागाच्या क्षेत्रपालांनी छापेमारी केली असता दुकान मालक शिवा नाडार याने काउंटरच्या खाली प्लास्टिक बादलीत चार दुर्मिळ जिवंत कासव विक्रीसाठी ठेवल्याचे त्यांना आढळले. वनविभागाने चार कासवे जप्त करून नाडार याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार वन्य प्राणी खरेदी करणे, विक्री करणे, जवळ बाळगणे, पाळणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपवनसंरक्षण जितेंद्र रामगावकर, सहाय्यक वनरक्षक आणि गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल पवार, परदेशी, आणि ठाणे राउंड स्टाफ आदींनी ही कारवाई केली.

Intro:इंडियन स्टार टॉरटाईज दुर्मिळ कासवाची विक्री करणाऱ्या इसमाला गजाआडBody:

वनविभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाण्यातील बालाजी अक्वेरीयम या मासे आणि पक्षी विक्री करणाऱ्या दुकानात इंडियन स्टार टॉरटाईज या प्रजातीच्या दुर्मिळ कासवाची होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनक्षेत्रपाल ठाणे यांच्या पथकाने छापेमारी करीत चार दुर्मिळ जिवंत कासव हस्तगत केली. या प्रकरणी शिवा मुतुरामलिंगम नाडार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे.

ठाणे वनविभाग क्षेत्रपाल याना मिळविलेल्या खबरी नुसार वनविभागाच्या पथकाने ठाण्यातील बालाजी अक्वेरीयम शॉप नं ६, वसंत विहार जि -ठाणे या दुकानात छापेमारी करीत तपासणी केली. असता दुकान मालक शिवा मुतुरामलिंगम नाडार(३२) रा. मानपाडा पोलीस ठाण्याजवळ, रम नं ५०२मी बिल्डिंग नं १ मानपाडा याने काउंटरच्या खाली प्लास्टिक बादलीत चार दुर्मिळ जिवंत कासव विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. वनविभागाने चार कासवे जप्त करून नाडार याला अटक केली. त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार खरेदी करणे, विक्री करणे, जवळ बाळगणे, पाळणे आदींबाबत गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सादर छापामारीत उपवनसंरक्षण जितेंद्र रामगावकर, सहाय्यक वनरक्षक आणि गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल पवार, परदेशी, आणि ठाणे राउंड स्टाफ आदींनी सहभाग घेतला. अधिक तपास वनपाल ठाणे नरेंद्र मुठे करीत आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.