ठाणे - दलित पँथर ( Dalit Panther ) फोडण्याचे काम भाजपाने ( BJP ) केले आहे. प्रचंड ताकद एकत्र येणे सनातन वादाच्या दृष्टिकोनातून घातक गोष्ट आहे. त्यांना आपण एकत्र येणे हेच नको आहे. दलित जनता एकत्र न येण्याचे काम भाजपा करत आहे. दलित शक्तीला एकत्र येण्यासाठी भाजपा हा पक्ष रोखत आहे, असे आरोप मल्लिका ढसाळ ( Mallika Dhasal ) यांनी केला आहे. तर दलित समाज अनेक गटा तटात विखूरला गेला आहे. सगळ्यांनाच नेते व्हायचे आहे. सगळ्यांनाच चमकोगिरी करायची आहे. नेते पदाधिकारी इगोत अडकले आहेत, अशी खंतही दलित पँथरच्या मल्लिका ढसाळ यांनी व्यक्त केली. राज्यस्तरीय कार्यकर्ता बैठकीत ( State Level Worker Meeting ) त्या ठाणे येथे बोलत होत्या.
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका बघता आता पुन्हा नव्याने दलित पँथर संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर संघटना मोठ्या ताकतीने वाढवणार आहे. लोकांच्या हिताचे काम करणार असल्याचे नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथर संघटनेच्या मल्लिका ढसाळ व नव्याने झालेले राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच यावेळी सत्ताधारी पक्षावर देखील निशाणा साधला.
'भाजपा दलितांना एकत्र येण्यापासून रोखत आहे'
ओबीसी आरक्षण बाबबत राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर चाल ढकल करत आहे. ओबीसीच्या मोठ्या नेत्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रभर दलित पँथर मोठ्या संख्येने ताकतीने उमेदवार देणार असून लोकांच्या मूळ प्रश्न मार्गी लावणार आहे, असे देखील दलित पँथर संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - Rupali Thombre Joins NCP : अजित पवारांच्या उपस्थितीत रुपाली ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश