ETV Bharat / state

माघी गणेशोत्सव : डोंबिवलीत साकारला वास्तवदर्शी समुद्र मंथनाचा देखावा

महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात २८ ते १ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी ६ ते ७ दरम्यान बेतवडे गावच्या गावदेवी माऊली मंडळाचे भजन होणार आहे.

माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्र मंथनावर साकारला देखावा

author img

By

Published : Jan 29, 2020, 9:27 AM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय सेवकवर्गाने माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्र मंथनाचा आगळावेगळा सध्याच्या सद्यस्थितीवर आधारित देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्र मंथनावर साकारला देखावा

महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात २८ ते १ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी ६ ते ७ दरम्यान बेतवडे गावच्या गावदेवी माऊली मंडळाचे भजन होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ६ ते ७ दरम्यान काटई गावच्या गोपाळ कृष्ण मंडळाचे भजन होणार आहे. शुक्रवारी सकाळी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. तर, सायंकाळी ६ ते ७ दरम्यान बेतवडे गावच्या हनुमान प्रसाद मंडळाचे भजन होणार आहे.

हेही वाचा - नवी मुंबई परिसरात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा

विशेष म्हणजे, श्रींचा देखावा सादर करताना शास्त्रीनगर रुग्णालयाचे कामगार रघुनाथ डांगे यांनी अप्रतिम सजावट केली आहे. तर, देव-दानव यांनी एकत्र येऊन सागरमंथन करून अमृत मिळवल्याचा देखावा येथे सादर करण्यात आला आहे. देशातील कष्ट करणारा शेतकरी आपल्या कष्टाने मेहनतीने धान्य, भाजीपाल्याचे उत्पादन करतो. मात्र, यातून फार कमी मेहनताना त्यांच्या पदरी पडतो. तर, कष्ट न करता फुकटची मलई (दलाली) काहींना मिळते. सागर मंथन या पौराणिक कथेतून आजच्या घडीची सत्यपरिस्थिती दाखविण्यात आली असून या ठिकाणी लावलेल्या फलकातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - आधीच्या सरकारने व्यावसायिकांच्या फायद्यासाठी राबविले घरांचे धोरण - जितेंद्र आव्हाड

Intro:kit 319Body:माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्र मंथनावर साकारला देखावा

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय सेवकवर्गाने माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्र मंथनाचा आगळावेगळा सध्याच्या सद्य स्थितीवर आधारित देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी पहिल्याच भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात 28 ते 01 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी 6 ते 7 दरम्यान बेतवडे गावच्या गावदेवी माऊली मंडळाचे भजन होणार आहे. गुरुवारी सायंकाळी 6 ते 7 दरम्यान काटई गावच्या गोपाळ कृष्ण मंडळाचे भजन होणार आहे. शुक्रवारी सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. तर सायंकाळी 6 ते 7 दरम्यान बेतवडे गावच्या हनुमान प्रासाद मंडळाचे भजन होणार आहे.
विशेष म्हणजे श्रींचा देखावा सादर करताना शास्त्रीनगर हॉस्पिटलचे कामगार रघुनाथ डांगे यांनी अप्रतिम सजावट केली आहे. तर देव-दानव यांनी एकत्र येऊन सागर मंथन करून अमृत मिळवून देशातील कष्ट करणारा शेतकरी आपल्या कष्टाने मेहनातीने धान्य, भाजीपाला उत्पादन करतात. यातून फार कमी मेहनताना त्यांच्या पदरी पडतो. मात्र कष्ट न करता फुकटची मलई (दलाली) काहींना मिळते. सागर मंथन या पौराणिक कथेतून आजच्या घडीची सत्यपरिस्थिती दाखविल्याचे देखावा सादर करणाऱ्याने सदर ठिकाणी लावलेल्या फलकातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Conclusion:dombiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.