ETV Bharat / state

येत्या रविवारी छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही - खगोल अभ्यासक सोमण - आषाढी पौर्णिमा

रविवारी (दि.5 जुलै) आषाढी पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण होणार आहे. पण, ते भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

दा. कृ. सोमण
दा. कृ. सोमण
author img

By

Published : Jul 4, 2020, 8:24 PM IST

ठाणे - रविवारी (दि. 5 जुलै) आषाढ पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण होणार आहे. पण, ते भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

माहिती देताना खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण

याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, रविवारी 5 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 34 मिनिटांपासून 9 वाजून 25 मिनिटांपर्यंत चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेतून जाणार आहे. पण, त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तरपूर्व भाग सोडून आफ्रिका, यूरोपचा दक्षिण-पश्चिम भाग, अंटार्क्टिका, उत्तर भाग सोडून अमेरिका, न्युझिलॅण्ड येथून दिसणार आहे.

यानंतर 30 नोव्हेंबर, 2020 रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहणही भारतातून दिसणार नसल्याचे त्यानी सांगितले . रविवारी गुरुपौर्णिमा आहे. त्यादिवशी गुरुपौर्णिमा साजरी करण्यामध्ये या छायाकल्प चंद्रग्रहणाचा कोणताही अडथळा येणार नाही. तसेच छायाकल्प चंद्रग्रहणात कोणतेही ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळायचे नसतात असेही दा.कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - ठाण्यात पावसाचा जोर वाढला... सखल ठिकाणी साचले पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.