ETV Bharat / state

Thane Crime : कहरच! गर्लफ्रेंडचे दुसऱ्यासोबत लग्न झाल्याचा राग; बॉयफ्रेंडने थेट त्यांचं पोरगंच पळवलं

author img

By

Published : Apr 4, 2023, 7:16 PM IST

Updated : Apr 4, 2023, 7:36 PM IST

ठाण्यातील भिवंडीत एका प्रियकराने त्याच्या विवाहीत प्रेयसीला मिळवण्यासाठी तिच्या लहान मुलाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत जलद कारवाई करत आरोपीला अवघ्या बारा तासांत अटक केली.

Thane Crime
ठाणे क्राइम
शंकर इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

ठाणे : भिवंडीतील एका 32 वर्षीय महिलेचे 27 वर्षीय तरुणाशी पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र तिचा विवाह दुसऱ्या तरुणाशी झाला होता. तरीही तिच्या प्रियकराने तिला त्याच्या सोबत राहण्याचा तगादा लावला. मात्र तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. यामुळे चिडून त्याने तिच्या चार वर्षीय मुलाच्या अपहरणाचा कट रचला. मुलाचे अपहरण करून गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकराला नाशिक रेल्वे स्थानकावर भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अवघ्या 12 तासात अटक केली. रिपोन आकाश अली व्यापारी (27) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिपोन हा मूळचा पश्चिम बंगालच्या कुजबिहार जिल्ह्याचा रहिवाशी आहे. तक्रारदार ही देखील तिथलीच रहिवाशी असून, या दोघात लग्ना आधीच प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या भिवंडीतील टेमघर येथील चाळीत राहणाऱ्या एका तरुणासोबत निकाह झाला. तेव्हापासून ते दोघे आपल्या चार वर्षीय मुलासह टेमघर परिसरात राहत आहेत. प्रियकराने तिच्याकडे आपल्या मूळ गावी जाऊन संसार थाटू, असा तगादा लावला होता. मात्र ती त्याला नकार देत होती.

3 एप्रिलला केले अपहरण : 3 एप्रिल रोजी सायंकाळी त्यांचा लहान मुलगा घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाला. त्याचा बराच शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर सायंकाळी सात वाजता दोघा पती पत्नींनी शांतीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अपहरणकर्त्याचा शोध सुरु केला. दरम्यान, प्रियकर रिपोन याने प्रेयसीच्या मोबाईलवर संपर्क साधून मुलाच्या अपहरणाची माहिती दिली. तसेच त्याने तिला त्याच्या सोबत राहायला आली नाही तर तुझ्या मुलाचे बरेवाईट करेन, अशी धमकी देखील दिली.

अवघ्या बारा तासांत केली अटक : त्यानंतर तिने पोलिसांची संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन तपासले असता, तो नाशिक शहरात असल्याचे समोर आले. त्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे व पोलीस पथकाने तातडीने दोन पथक तयार करून आरोपीला पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. महिला पोलीस अधिकारी मुक्त फडतरे यांनी नाशिक रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवर आरोपी रिपोन व्यापारी याला अटक केली. घटनेनंतर अवघ्या बारा तासातच पोलिसांनी आरोपीला पकडून बेड्या ठोकल्या.

हेही वाचा : Mumbai Crime: चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ, प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका करायच्या लहानग्यांचा छळ

Last Updated : Apr 4, 2023, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.