Live Updates-
5.48-15 व्या फेरीच्या अखेरीस डॉ. श्रीकांत शिंदे यांची विक्रमी मताधिक्क्याकडे वाटचाल. डॉ.शिंदे- 4 लाख 21 हजार 977 मते, बाबाजी पाटील- 1 लाख 13 हजार 870 मते , संजय हेडाव यांना 50 हजार 224 मते.
4.41-13 व्या फेरीअखेर डॉ. श्रीकांत शिंदे यांना 2 लाख 41 हजार 064 मतांची आघाडी. बाबाजी पाटील यांना 95 हजार 212 मते तर वंचीतचे उमेदवार 42 हजार 137 मते आणि नोटाला 7773 मते मिळाली आहेत.
3.44- 12 व्या फेरी अखेरीस डॉ. श्रीकांत शिंदे 207802 लाख मतांनी आघाडीवर.
1.28- चौथ्या फेरी अखेरीस डॉ. श्रीकांत शिंदे 1 लाख 31 हजार 692 मतांनी आघाडीवर.
1.10- चौथ्या फेरीच्या अखेरीस सेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे 1 लाख 19 हजार 628 मतांनी आघाडीवर
12.02- दुसऱ्या फेरी अखेर डॉ. श्रीकांत शिंदे 74029 मतांनी आघाडीवर. शिंदे यांना मिळाली 1 लाख 07 हजार 810 मते तर महाआघाडीचे बाबाजी पाटील यांना 33 हजार 781 मते मिळाली. वंचितचे संजय हेडाव यांना 18 हजार 689 मते मिळाली.
11.41- डॉ. श्रीकांत शिंदे 65 हजार 687 मतांनी आघाडीवर. डॉ. श्रीकांत शिंदे- 94 हजार 718 मते, महाआघाडीचे बाबाजी पाटील- 29 हजार 031 मते, वंचित आघाडीचे उमेदवार संजय हेडाव- 15 हजार ९३२ मते
11.34- दुसऱ्याफेरी अखेर शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे 52859 मतांनी आघाडीवर. दुसऱ्याफेरी नंतर श्रीकांत शिंदे यांना 76839 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना 23980 मते मिळाली
10.28- शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे 18 हजार मतांनी आघाडीवर
10.15- चौथ्या फेरी अखेर डॉ. श्रीकांत श्रीकांत 11 हजार 425 मंतानी आघाडीवर असून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना 5 हजार 274 मते मिळाली आहेत.
9.45.- मतमोजणीच्या तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदेना 12465 मते मिळाली तर बाबाजी पाटील यांना 4478 मते मिळाली. डॉ. श्रीकांत शिंदे 7986 मंतानी आघाडीवर आहेत.
8.00 am- प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात
ठाणे -कल्याणचा सुभेदार कोण होणार हे जवळ जवळ स्पष्ट झाले असून डॉ. श्रीकांत शिंदे यांची विक्रमी मताधिक्क्याकडे वाटचाल केली आहे. 15 व्या फेरीच्या अखेरीस डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतांनी 3 लाखांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिंदे यांचा विजया निश्चित आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे तर राष्ट्रवादीकडून बाबाजी पाटील व वंचित बहुजन आघाडीचे सुनील हेडावु यांच्यासह एकूण २८ उमेदवार रिंगणात होते.
आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांची भिस्त आगरी, कोळी, मुस्लिम, आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पारपंरिक मतांवर आहे. त्यातच कल्याण ग्रामीण, मुंब्रा, आणि उल्हासनगर या विधानसभा मतदारसंघातून बऱ्यापैकी आघाडीला मतदान होण्याची शक्यात वर्तविण्यात आली होती. तर युतीचे डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांची भिस्त डोंबिवली, कल्याण पूर्व, अंबरनाथ या विधानसभेतील मतदारांवर आणि भाजप सेनेच्या पारंपारिक मतावर अवलंबून आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुत्राला पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी चंग बांधला आहे. यामुळे दोघांमध्येच काटे की टक्कर होणार आहे. कल्याण लोकसभेसाठी यावर्षी 45.28 मतदान झाले आहे.
2014 ची परिस्थिती
मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना कल्याण लोकसभा मतदारसंघात अवघे ४२.८० टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीत नवख्या असणाऱ्या श्रीकांत शिंदे यांनी तब्बल अडीच लाखांचे मताधिक्य मिळवले होते.