ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात लॉटरी विक्रेत्यांवर परिणाम नाही; मात्र, जीएसटीमुळे विक्रीत घट - Lottery Ticket Dealers News

कोरोनाच्या काळात केंद्र सरकारसह राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. मात्र लॉकडाऊनच्या सात महिन्याच्या काळात लॉटरी विक्रेत्यांवर परिणाम झाला नसल्याचे लॉटरी विक्रेत्यांनी सांगितले. 'आम्हाला विविध लॉटरी एजन्सीवाल्यांची मदत मिळाली होती. विशेष म्हणजे लॉकडाऊनपूर्वी विविध एजन्सींकडून घेतलेली लॉटरीची तिकिटे त्यांनीच पुन्हा परत घेतली. त्यामुळे आमचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही,' असेही लॉटरी विक्रेत्यांनी सांगितले.

लॉटरी तिकीट विक्रेते न्यूज
लॉटरी तिकीट विक्रेते न्यूज
author img

By

Published : Dec 22, 2020, 2:38 PM IST

Updated : Dec 22, 2020, 2:51 PM IST

ठाणे - कोरोनाच्या काळात केंद्र सरकारसह राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. मात्र लॉकडाऊनच्या सात महिन्याच्या काळात लॉटरी विक्रेत्यांवर परिणाम झाला नसल्याचे लॉटरी विक्रेत्यांनी सांगितले. 'आम्हाला विविध लॉटरी एजन्सीवाल्यांची मदत मिळाली होती. विशेष म्हणजे लॉकडाऊनपूर्वी विविध एजन्सींकडून घेतलेली लॉटरीची तिकिटे त्यांनीच पुन्हा परत घेतली. त्यामुळे आमचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही,' असेही लॉटरी विक्रेत्यांनी सांगितले.

लॉकडाऊन काळात लॉटरी विक्रेत्यांवर परिणाम नाही
जीएसटीच्या टाक्यात वाढ झाल्याने विक्रीत घट

जुलै 2017 पासून केंद्र सरकारने लॉटरीवर 28 टक्के कर आकारल्याने लॉटरीच्या बक्षिसाच्या रकमेत बदल केला आहे. मात्र जीएसटी पूर्वी 90 टक्के परतावा असलेल्या लॉटरीमध्ये जीएसटी कर लागू केल्याने 60 टक्के इतका परतावा घटला आहे. त्यामुळे लॉटरी विक्री व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला असून लॉटरी विक्रीत घट झाली आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष; कोट्यावधीचा निधी खर्च; मात्र, नदी प्रदूषणाचा प्रश्न जैसे थे!

लॉकडाऊनमुळे होळी ते दिवाळीत बंपर धमाका झालाच नाही

लॉकडाऊन काळात होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा, दिवाळी इतरही विविध लॉटरीचा धमाका लॉटरी एजन्सीवाले मोठ्या प्रमाणात जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करतात. यामुळे ग्राहकांचा लॉटरीच्या तिकीट खरेदीसाठी कल असतो. मात्र लॉकडाऊनमुळे विविध लॉटरीचा बंपर धमाका झालाच नसल्याने ही तिकीटे पडून होती. आता मात्र, अनलॉक काळात नाताळ बंपर धमाका लॉटरीचे तिकीट विकले जात असल्याचेही सांगण्यात आले. तर, दुसरीकडे ऑनलाइन लॉटरी विक्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले.

पारंपारिक सणाच्या लॉटरीचा ग्राहक वळला झटपट लॉटरीकडे

अनलॉक काळात आता पारंपारिक विविध सणांच्या लॉटरी बाजारात विक्रीसाठी आले आहेत. मात्र बक्षिसांची झटपट रक्कम हातोहात मिळवण्यासाठी सध्याचा ग्राहक परराज्यातील झटपट लॉटरीकडे वळला आहे. तर काही ग्राहक मटका-वरळी लॉटरीत आपले नशीब आजमावताना दिसून आले आहेत.

हेही वाचा - Exclusive : कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची भीती कायम, पालिकेने घेतला 'हा' निर्णय

Last Updated : Dec 22, 2020, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.