ETV Bharat / state

आयसोलेशन वॉर्ड बनविण्यास कासारवडवलीकरांचा विरोध, बीएसयुपी इमारतीत कोरोनाग्रस्तांना ठेवण्यास नकार - बीएसयुपी इमारत कासारवडवली बातमी

कोरोनाबाधितांसाठी ठाण्याच्या श्रीनगर येथे सुविधा भूखंडावर बांधण्यात आलेल्या इमारतीत विलगीकरण कक्ष बनवण्यास स्थानिकांकडून विरोध करण्यात आला. यानंतर, कासारवडवली येथील बीएसयुपीच्या इमारतीतमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यासाठी अचानक खाट आणि इतर सामान सोमवारी सकाळी आणायला सुरुवात करताच येथेही स्थानिकांनी जमाव करून याठिकाणी कोरोनाग्रस्तांना ठेवण्यास नकार दिला.

बीएसयुपी इमारतीत कोरोनाग्रस्तांना ठेवण्यास नकार

author img

By

Published : Mar 17, 2020, 10:27 AM IST

ठाणे - कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ठाण्यातील श्रीनगर येथे सुविधा भूखंडावर बांधण्यात आलेल्या इमारतीत विलगीकरण कक्ष बनविण्यास स्थानिकांकडून विरोध झाला. यानंतर, कोरोनाबाधित व्यक्तींना कासारवडवली येथील बीएसयुपीच्या इमारतीतमध्ये ठेवण्यासही स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.

बीएसयुपी इमारतीत कोरोनाग्रस्तांना ठेवण्यास स्थानिकांचा नकार

या इमारतीमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यासाठी अचानक खाट आणि इतर सामान सोमवारी सकाळी आणायला सुरुवात करताच, या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले. स्थानिकांमध्ये रोष एवढा होता की, त्यांनी येथील खाटदेखील बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला. अखेर स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर आणि इतर नगरसेवकांनी पालिका यंत्रणेशी संपर्क केला. त्यानंतरस नागरिकांचा प्रचंड विरोध असल्याने त्या ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा वॉर्ड या ठिकाणी सुरू करणार नसल्याचे लेखी आश्वासन मिळावे, यासाठी हजारो नागरिकांनी सह्यांचे निवेदन ठाणे महापालिकेला दिले आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी प्रभारी पालिका आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशी चर्चा केल्यानंतर श्रीनगर येथील आयसोलेशन वॉर्डची कल्पना बारगळली होती. त्यानंतरच कासारवडवली येथील बीएसयूपीच्या इमारतीमध्ये वॉर्ड करण्याचा घाट घालण्यात आला. परंतु, स्थानिकांना याची खबर लागताच त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एक तर हा वॉर्ड सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेतले नाही. तर, दुसरीकडे ही इमारत कासारवडवली गावाला लागून असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याची शंका सिद्धार्थ ओवळेकर यांनी उपस्थित केली आहे.

हेही वाचा - Coronavirus : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आठवड्यातून 2 दिवस बंद

नागरिकांचा रोष बघून त्यांनी प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशीही चर्चा केल्यानंतर अखेर या ठिकाणी वॉर्ड सुरू करत नसल्याचे पालिकेने तोंडी आश्वासन दिले. मात्र, गावकऱ्यांनी ठाणे महापालिकेला लेखी पत्र दिले असून हा वॉर्ड सुरू करण्यात येणार नसल्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात देखील सुविधा निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये रोझा गार्डनिया येथे १५ खाटांची विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे ८ खाटांची विलगीकरण आणि खासगी रुग्णालयांमध्ये १२ खाटांची विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

हेही वाचा - कोरोनाचे सावट: 'डोहाळे'च्या निमित्ताने महिलांनी मास्क बांधून पार पाडला कार्यक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.