ठाणे - शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपानेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. एमएमआरडीए आणि एनएसएलमध्ये केलेल्या घोटाळ्यात जेलमध्ये जाण्याची भीती असल्याने शिवसेना नेते तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच उद्धव ठाकरे यांची सेना कोरोना काळात भ्रष्टाचार करणारी सेना असल्याचेही त्यांनी म्हटले.
प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र -
शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे कोणता पक्ष वाढवत आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या पत्रात भाजपासोबत जुळवून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रताप सरनाईक यांच्या मागे ससेमिरा आहे. असे असताना ९ जून रोजी लिहिलेल्या पत्रामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधल्या लढाईचा उल्लेख केलेला आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांची सर्वोच्च न्यायालयात धाव, पुनर्विचार याचिका दाखल