ETV Bharat / state

शहाडमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी - pipeline broke in shahad

शहाडमध्ये सकाळी उल्हास नदीच्या पंपिंग स्टेशनवरून येणारी 1,750 मीमी डायमीटरची मोठी पाईपलाईन फुटली. या घटनेमुळे परिसरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

thane shahad pipeline broken
कल्याण-आंबवली रेल्वे मार्ग पाईपलाईन फुटली
author img

By

Published : Jan 2, 2021, 2:30 PM IST

ठाणे - कल्याण-आंबवली रेल्वे मार्गावरील वडवली रेल्वेगेटच्या बाजूला असलेली पाईपलाईन फुटुन लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. शहाडमध्ये सकाळी उल्हास नदीच्या पंपिंग स्टेशनवरून येणारी 1,750 मीमी डायमीटरची मोठी पाईपलाईन फुटली. या घटनेची माहिती मिळताच संबधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाईपलाईनची अर्ध्या तासात दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केल्याचेही दिसून आले आहे.

कल्याण-आंबवली रेल्वे मार्ग पाईपलाईन फुटली
भिवंडी शहरातील पाणीपुरवठा खंडित या पाईप लाईनमधून भिवंडी शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती भिवंडी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी एल. पी. गायकवाड यांनी दिली आहे. तसेच मध्यरात्रीही शहाड पंपींग स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर सकाळच्या सुमारास पाईपलाईन फुटल्याने भिवंडीतील स्टेमचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे आज सायंकाळपर्यत भिवंडी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.