ETV Bharat / state

Konkan Teacher Election : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ९१ टक्के तर जिल्ह्यात ८८. ८६ टक्के मतदान - कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी आज ठाणे जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर दु. 4 वाजेपर्यंत पाचही जिल्ह्यात ९१ टक्के मतदान झाले असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात साधारणपणे ८८. ८६ टक्के मतदान झाले.

Etv Bharat
फाईल फोटो
author img

By

Published : Jan 30, 2023, 8:36 PM IST

ठाणे - आज कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे. आता मतमोजणी गुरुवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून नवी मुंबईत सुरु होणार आहे, अशी माहिती शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

मतदानाची टक्केवारी - कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत मतदान पार पडले. या निवडणुकीकरीता नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यातील एकूण २० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यात एकूण १५ हजार ३०० शिक्षक मतदार होते. यामध्ये ६०२९ पुरुष तर ९२७१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. आज झालेल्या मतदानात एकूण १३ हजार ५९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

काटेकोर नियोजन - जिल्हा निवडणूक कार्यालयाने केलेल्या जनजागृती व इतर उपाययोजनांमुळे शिक्षक मतदारसंघासाठी ठाणे जिल्ह्यात आज ८८. ८६ टक्के मतदान झाले. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची मतदान प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच मतदान केंद्रांवर व्हिडीओग्राफी व वेबकास्टींगद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितले.

2 फेब्रुवारीला मतमोजणी - मतदान संपल्यावर मतदान अधिकारी/ कर्मचारी यांच्यामार्फत सर्व मतपेट्या पोलीस बंदोबस्तासह जिल्हा मुख्यालय येथे एकत्रित करण्यात येऊन नंतर एकत्रितपणे त्या नवी मुंबईतील आगरी कोळी संस्कृती भवन, नेरुळ (पश्चिम) येथील मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात येत असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.