ठाणे - कोरोना काळातही परप्रांतीयांचे लोंढ्याचे लोंढे हजारोच्या संख्येने राज्यात बिनधास्तपणे रोजच दाखल होत आहेत. मग कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणावासीयांनाचा का टार्गेट केले जाते? असा संतप्त सवाल कोकणवासीयांनी राज्य सरकारला केला. शिवाय गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांची कोरोना टेस्ट रद्द करा, अशी मागणीही ठाणे जिल्ह्यातील कोकणवासीयांनी केली आहे.
मग त्यांनी कोकणात जायचे कसे?
कोकण आणि गणेशोत्सवाचे अतूट असे नाते आहे. दरवर्षी गणेशोत्सवानिमित ठाणे जिल्ह्यातील लाखो चाकरमानी सहकुटुंब कोकणाकडे रवाना होतात. मात्र, यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. ऐनवेळी टेस्ट करायला लावणे म्हणजे अन्यायकारक असल्याचे मत कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर, अंबरनाथ , ठाणे परिसरातील कोकणी बांधवांनी केली आहे. दोन महिन्यापूर्वी ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली त्याला 84 दिवसानंतर दुसरा डोस मिळणार असून त्यांनी कोकणात जायचे कसे ? असा प्रश्नही उपस्थित केला.
हेही वाचा - कोकणवासियांना बाप्पा पावला 'टोल फ्री' प्रवासाचा मार्ग मोकळा
मतदानावेळी रोष व्यक्त करण्याचा मानस -
एकीकडे केंद्र शासन व राज्य शासन कोकणवासियांची गणपतीला ये-जा करण्यासाठी बस व रेल्वेची सुविधा करत आहे. तर दुसरीकडे अशाप्रकारे नियम लावून त्यांना प्रवास करू देत नाही. असे सांगत कोरोना टेस्ट सक्तीत शिथिलता द्यावी, अशी मागणी कोकणवासी करत आहे. कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे व नजीकच्या परिसरात मोठ्या संख्येने कोकणवासीय राहतात. येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी याबाबत रोष व्यक्त करण्याचा मानस दाखवला आहे.