ठाणे : मंदिराचा कॅमेरा तोडल्याचे (dispute over temple camera being broken ) परिसरातील लोकांना सांगितल्याच्या वादातून ९ जणांच्या टोळक्याने चार जणांवर चाकू हल्ला करीत बेदम मारहाण (Knife attack and beaten) केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ९ जणांच्या टोळीतील मुख्य आरोपींनी दोन तरुणांच्या पार्श्वभागात धारदार चाकूने भोसकले (Knife attack). तर एकाची करंगळी चाकूने कापून गंभीर जखमी (finger cut injured) केले.
तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी- ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील जावसाई गावातील हनुमान मंदिरानजीक घडली आहे. याप्रकरणी ९ जणांच्या हल्लेखोर टोळी विरोधात सागर तान्हाजी शेकटे याच्या तक्ररीवरून डझनभर कालमानुसार अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार सागर तान्हाजी शेकटे (वय २३) हा २४ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत अंबरनाथ पश्चिम भागातील जावसाई गावातील हनुमान मंदिरानजीक गप्पा मारत होता. त्याच सुमाराला मुख्य आरोपी राहुल जाधव हा त्याठिकाणी येऊन सागर व त्याच्या मित्राला हनुमान मंदिराचा कॅमेरा तोडल्याचे लोकांना का सांगतात यावरून दोघांमध्ये वाद झाला. मुख्य आरोपी राहुलने शिवीगाळ करत गोंधळ घालत आणि एका एकाला बघून घेईल तसेच सागरसह मित्रांना ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेला.
बिअरच्या बॉटल्स फेकून मारल्या - त्यानंतर पुन्हा ९ जणांच्या हल्लेखोर टोळीसह मुख्य आरोपी मध्यरात्री येऊन सागर व त्याच्या मित्रांसोबत जोरदार राडा घातला. यावेळी सागर व त्याच्या मित्रांना बेदम मारहाण करत मुख्य आरोपीने दशरथ जगताप आणि संतोष जगताप यांच्या पार्श्वभागात धारदार चाकूने भोसकले. तर दुसऱ्या एका आरोपीने किरण म्हस्कर यांचे वडील भांडण सोडविण्यासाठी आले असता, आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला करत त्यांची करंगळी कापून गंभीर जखमी केले. जोरदार राडा सुरु असतानाच तक्रारदार सागरच्या दिशेने इतर आरोपींनी बियरच्या बाटल्या फेकून मारल्या. त्यामध्ये सागरही जखमी झाला आहे. तर हल्लेखोरांनी म्हस्कर यांच्या घरावर दगडफेक करत त्यांच्या अंगणात उभे असलेल्या वाहनाची काच फोडून नुकसान केले.
9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल- दुसरीकडे जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून सागर शेकटे याच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी राहुल जाधव, अक्षय पवार, प्रतीक भोईर, रितेश पगारे, लाल्या मोरे, राहुल उर्फ डूगा फाले आणि तोडांला रुमाल बांधलले दोघे आढळून आहे. एकूण ९ जणांच्या टोळी विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात २५ ऑक्टोंबर रोजी भांदवी कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३३७, ४२७, १४३, १४७, १४८, १२९, ३७(३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी करीत आहेत.