ETV Bharat / state

कोविड हत्याकांड कधी थांबणार? माजी खासदार किरीट सोमैया यांचा ठाकरे सरकारला सवाल - bjp leader Kirit Somaiya news

मीरा भाईंदर क्षेत्रात कोविड मृत्यचे प्रमाण प्रचंड वाढले असून इथला मृत्यू दर लपवण्याचा प्रकार ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी केला. मीरा भाईंदर महानगरपालिका कोविड रुग्णालयाचा पाहणी दौरा केला त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले.

मीरा भाईंदर महानगरपालिका कोविड रुग्णालयाचा पाहणी करताना भाजप नेते किरीट सोमैय्या

author img

By

Published : Apr 29, 2021, 6:02 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर क्षेत्रात कोविड मृत्यचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. इथला मृत्यू दर लपवण्याचा प्रकार ठाकरे सरकार आणि महापालिका करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे मृत्यू जे आकडे समोर येत आहे त्यात फक्त २० टक्के मृत्यू दाखवले जात आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला.

माजी खासदार किरीट सोमैया यांच्याकडून मीरा भाईंदर महानगरपालिका कोविड रुग्णालयाचा पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी त्यांनी भाईंदर पूर्वच्या स्व.प्रमोद महाजन कोविड रुग्णालय, अप्पासाहेब धर्माधिकारी व पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर टीका केली.

ठाकरे सरकारवर गंभीर आरोप -

मीरा भाईंदर क्षेत्रात कोविड मृत्यचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. इथला मृत्यू दर लपवण्याचा प्रकार ठाकरे सरकार आणि महापालिका करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे मृत्यू जे आकडे समोर येत आहे त्यात फक्त २० टक्के मृत्यू दाखवले जात आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार,कल्याण डोंबिवली किंवा मीरा भाईंदर या सगळया क्षेत्रात जानेवारीमध्ये शहरात कोविडमुळे एका रुग्णाचा मृत्यू होत होता तर एप्रिल 12नंतर दररोज २५ मृत्यू होत आहेत. मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येत आहेत त्याचा कंपायजेशन मी करून देत आहे. तसेच वसई महापालिका क्षेत्रात पहिल्या १४ दिवसात कोविडमुळे २०१ मृत्यू झाले मात्र त्यांनी दाखवले २३ मृत्यू आहेत. तर ठाणे महापालिकेत ३६९ मृत्यू झाले मात्र त्यांनी दाखविलेली संख्या ५७ आहे. मीरा भाईंदरमध्ये तीच अवस्था आहे.

महानगरपालिकामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड घोटाळा -

मीरा भाईंदरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे प्रमाण कमी आहे. जर महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात ७०० च्या जवळपास रुग्ण ऑक्सिजनवर आहे तर तिथे फक्त १०० रेमडेसिवीर मिळत आहेत ही भयानक परिस्थिती आहे. जर खासगी ७०० ऑक्सिजन बेड असतील तर त्यांना ७० रेमडेसिवीर मिळत आहे, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ही अवस्था मीरा भाईंदरमध्ये सुद्धा घडू शकते असेही सोमैया म्हणाले.

वाझे प्रकरणी सरकरावर ताशेरे -

ठाकरे सरकार वाझे प्रकरणात व्यस्त आहे. वाझे वसुली घोटाळ्याचा तपास मीरा भाईंदरला पण पोहोचू शकतो. या प्रकरणी मी स्वतः सीबीआयकडे जाऊन साडेआठशे पाणी तक्रार नोंदवली आहे. तर त्यात आता हा कोविड घोटाळा. या प्रकरणी मी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली आहे, असेही ते म्हणाले.

पालिकेची लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार -

मीरा भाईंदर महानगरपालिकेत कोविड काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एक गाडी घ्यायला गेलो तर सात लाखांची येणार त्या वाहनाला महापालिकेनी दोन महिन्यांच्या काळात भाडेच ७ लाख दिले आहे. त्यात कोविड सेंटरमध्ये जो भ्रष्टाचार केला आहे, औषध विकत घेण्यात जो भ्रष्टाचार केला आहे त्याची एक वेगळी तक्रार लाचलुचपत विभागाकडे सोमवारी दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.