ETV Bharat / state

Thane Crime : आई फोन उचलत नसल्याने मुलीने घर गाठले, दृष्य पाहून 'ती' झाली सुन्न...

डोंबिवली पूर्वेकडील घारिवली गावात ६५ वर्षीय एका विधवा महिलेची तिच्या राहत्या घरात अज्ञात आरोपीने हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेच्या अंगावरील तसेच घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. अनिता पाटील ( वय ६५) असे हत्या झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे.

Wodow Woman Murder in Dombivali
महिलेची हत्या
author img

By

Published : May 6, 2023, 9:15 PM IST

ठाणे: पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनिता पाटील या घारिवली गावातील अर्जुन एम्पायर इमारती मधील एका आलिशान घरात एकट्याच राहत होत्या. तर त्यांना एक विवाहित मुलगी असून ती सासरी राहते; मात्र दोघी माय-लेकीचा दररोज मोबाईलवरून संपर्क होत होता. आज (शनिवार) मुलगी आईला सकाळच्या सुमारास मोबाईलवरून संपर्क करत होती. मात्र सतत मोबाईलवर संपर्क करुनही आई प्रतिसाद देत नसल्याने मुलीला संशय आला. त्यामुळे ती तातडीने आई अनिताच्या घारिवली गावातील अर्जुन एम्पायर इमारती घरी आली होती. मात्र बराच वेळ दार ठोठावूनही आई दार उघडत नसल्याने तिने शेजाऱ्यांना याची माहिती दिली.

चोरी, हत्येच्या गुन्ह्याची नोंद: त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने बाजूच्या खिडकीतून अनिता यांच्या घरात डोकावून पाहिल्यावर अनिता मृत अवस्थेत घरात पडल्या होत्या. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने गायब झाले होते. दरम्यान घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर मृतक अनिताच्या मुलीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात हत्येसह दागिने चोरीचा गुन्हा दाखल केला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराला शोधण्याचा प्रयत्न: पोलीस सूत्रांच्या मते शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने चोरट्याने अनिता यांच्या घरात प्रवेश केला असावा, त्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत असताना मृत अनिता यांनी प्रतिकार केल्यामुळे चोरट्याने त्यांची हत्या केली असण्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मानपाडा पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हत्या करणाऱ्या आरोपीचा माग काढत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येसह चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

हेही वाचा: Geoglyphs Art Barsu : बारसू रिफायनरीमुळे अश्मयुगीन कातळशिल्प नष्ट होणार? काय आहे त्याचं महत्त्व जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.