ETV Bharat / state

भिवंडीत दहा वर्षीय शाळकरी मुलीचा अपहरणाचा प्रयत्न; मुलीच्या सतर्कतेने वाचला जीव - भिवंडी अपहरण बातमी

आलिया पाटील ही शनिवारी सकाळी दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास शाळेतून घरी येत होती. त्यावेळी राहत्या इमारतीच्या गेटच्या बाजूला एक अनोळखी बुरखा घातलेल्या अज्ञात महिलेने तिचे दोन्ही पाय पकडले. त्यामुळे आलीया खाली जमिनीवर कोसळली. बुरखाधारी महिला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असतानाच आलियाने सदर महिलेस प्रतिकार केला.

thane
कोनगाव पोलीस ठाणे
author img

By

Published : Dec 16, 2019, 10:15 PM IST

ठाणे- शाळेतून घरी परतणाऱ्या एका १० वर्षीय मुलीच्या अपहरणाचे प्रयत्न केल्याची घटना कोनगावात घडली आहे. मात्र, मुलीच्या सतर्कतेने हा अपहरणाचा डाव फसला असून मुलीने स्वतःची सुटका करून आपला जीव वाचवला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात बुरखाधारी महिलेच्या विरोधात मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. अलिया अमन पाटील (१०) असे अपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीचे नाव आहे.

भिवंडीत महिला, युवती व शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेसाठी भिवंडी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविली जात असतानाच दुसरीकडे शाळकरी मुलींच्या अपहरणाचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अलिया पाटील ही शनिवारी सकाळी दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास शाळेतून घरी येत होती. त्यावेळी राहत्या इमारतीच्या गेटच्या बाजूला एक अनोळखी बुरखा घातलेल्या अज्ञात महिलेने तिचे दोन्ही पाय पकडले. त्यामुळे आलीया खाली जमिनीवर कोसळली. बुरखाधारी महिला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असतानाच आलियाने सदर महिलेस प्रतिकार केला. यावेळी आलियाने प्रसंगावधान राखत अनोळखी महिलेला जोरात लाथ मारल्याने अज्ञात महिला देखील जमिनीवर कोसळली. त्यावेळी आलियाने या महिलेच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली व घर गाठले.

सदर प्रकार आलियाने तिची आई अफसानाला सांगितले. त्यानंतर आलियाची आई सदर महिलेचा शोध घेण्यासाठी इमारती खाली गेली असता सदर बुरखाधारी महिलेने तेथून पळ काढला होता. या प्रकरणी आलियाचे वडील अमन यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात बुरखाधारी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ए.पी.आय नरेंद्र पवार करीत आहे.

हेही वाचा- लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी! २२ वर्षीय तरुणीचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू

Intro:kit 319Body: दहा वर्षीय शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; मुलीच्या सतर्कतेने वाचला जीव

ठाणे : शाळेतून घरी परतणाऱ्या एका दहा वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना कोनगावात घडली आहे. मात्र मुलीच्या सतर्कतेने हा अपहरणाचा डाव फसला असून मुलीने स्वतःची सुटका करून आपला जीव वाचवत घर गाठले. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात बुरखाधारी महिलेच्या विरोधात मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. अलिया अमन पाटील ( १० ) असे अपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीचे नांव आहे.
भिवंडीत महिला, युवती व शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेसाठी भिवंडी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविली जात असतानाच दुसरीकडे शाळकरी मुलींच्या अपहरणाचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असे असतानाच शाळेतून घरी परतणाऱ्या अलिया शनिवारी सकाळी १० ते साडेदहा वाजेच्या सुमारास शाळेतून घरी येत होती. त्यावेळी राहत्या इमारतीच्या गेटच्या बाजूला एक अनोळखी बुरखा घातलेल्या अज्ञात महिलेने तिचे दोन्ही पाय पकडले. त्यामुळे आलीया खाली जमिनीवर कोसळली.आलीया हिस बुरखाधारी महिला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असतानाच आलियाने सदर महिलेस प्रतिकार केला.
यावेळी आलियाने प्रसंगावधान राखत अनोळखी महिलेला जोरात लाथ मारल्याने अज्ञात महिला देखील जमिनीवर कोसळली. त्यावेळी आलियाने या महिलेच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली व घर गाठले.सदरचा प्रकार आलियाने तिची आई अफसाना हिला सांगितल्याने सदर महिलेचा शोध घेण्यासाठी पुन्हा इमारती खाली गेली असता सदर बुरखाधारी महिला तेथून पळ काढला होता. या प्रकरणी आलियाचे वडील अमन यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात बुरखाधारी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एपीआय नरेंद्र पवार करीत आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.