ETV Bharat / state

केडीएमटी परिवहन वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू; पाच दिवसात दुसरा बळी - ठाणे कोरोना आकडेवारी बातमी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी केडीएमटीच्या 52 वर्षीय वाहकाला श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून केडीएमटीच्या कामगार वर्गात दु:खासह भीतीचे वातावरण पसरले आहे.

केडीएमटीच्या वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू
केडीएमटीच्या वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू
author img

By

Published : Jun 28, 2020, 7:25 PM IST

ठाणे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील 52 वर्षीय वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे 4 वाजता कोरोना संसर्गाशी लढताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, 24 जून रोजी याच परिवहन उपक्रमातील अन्य एका चालकाचा मृत्यू झाला होता. तर, आज एका वाहकाचा मृत्यू झाला असून या दोन्ही घटनांमुळे केडीएमटीच्या कामगार वर्गात दु:खासह भीतीचे वातावरण आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील 52 वर्षीय वाहकाला काही दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना आंबरनाथ येथील पालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु, डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. शिवाय केडीएमटीतील कामगार असल्याने त्यांना कल्याणच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, परिवहन कामगार असल्याचे ओळखपत्र दाखवूनही ते आंबरनाथ येथील रहिवासी असल्याने त्यांना आंबरनाथ येथेच उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले.

त्यानंतर त्यांना वांगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसाच्या उपचारानंतर त्यांना ठाणे येथे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर्सनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, या वाहकाची कोरोनाविरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली व त्यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. ते केडीएमटीतील कोरोनाचे दुसरे बळी ठरले. त्यांच्या मृत्यूने कुटुंबियांसह केडीएमटीतील कामगार वर्गात दु:खासह भीतीचे वातावरण पसरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.