मिरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर शहारातून पोलीस खात्यासाठी अतिशय दुर्दैवी बातमी समोर आली आहे. काशिमीरा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोमुळे मृत्यू झाला आहे.
काशिमीरा पोलीस ठाण्यातील या अधिकाऱ्यासह इतर 8 जणांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या संकट काळात आपले कर्तव्य बजावत असताना, पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. मीरा भाईंदमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला मुंबईच्या सेवन हिल्स रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.