मीरा भाईंदर - काशीमीरा पोलीस ठाण्यात १५ डिसेंबर २०२० ला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, क्रेडिट कार्डची फसवणूक करणारा आरोपी आशिष उकानी यांनी याने आपली मैत्रीण निकिता हिचा पैसेच्या वादातून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य आरोपी आशिष उकानीला काशीमीरा पोलिसांनी शिताफीने अटक केली. अद्याप एक आरोपीचा शोध काशीमीरा पोलीस करत आहे.
लितेश शेठे यांच्या मैत्रीण ऑनलाइन कंपनीला चार स्वॅप क्रेडिट कार्ड मशीन पुरवण्यात आल्या होत्या. कंपनीचे डायरेक्टर आशिष उकानी आणि निकिता दोषी यांनी या मशीन मधून शोभीत कुमार यांचे क्रेडिट कार्ड वापरून २९ हजार लिमिट असताना १५ लाख रुपयांची फसवणूक करत नमूद रक्कम बँकेतून काढून पळ काढला. मात्र, पोलिसांनी शिताफीने आशिष याला गुजरातमधून अटक केली. त्यात निकिता कुठे आहे याची विचारपूस पोलिसांनी करताना आपण तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती त्याने पोलिसांना दिली.
आशिष आणि निकिता हे दोघे अनेक ठिकाणी पैसेच्या फसवणूक करून पोलिसांना चकवा देत हे दोघे गुजरातच्या दिशेने पळाले आणि आरोपी आशिष उकानी व आरोपी निकिता दोषी सुरत येथे राहू लागले. दिनांक १५/१०/२० ला पहाटे २ वाजता निकिताला घेऊन आरोपी आशिष त्याच्या मूळगावी सेलना येथे घेऊन गेला आणि सकाळ होईपर्यंत दारू पित होता. निकिता आणि आशिषमध्ये पैसे वरून भांडण झाले. रागाच्या भरात त्याने निकिताला शेतात असलेल्या विहिरीत ढकलून दिले आणि त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र, आरोपीने गावातून दोरी आणून तिच्या शरीरास बांधून मृत निकिता हिला बाहेर काढले आणि शेतात खड्डा खणून त्यामध्ये प्रेत पुरून मीठ टाकले, अशी माहिती आशिषनी पोलिसांना दिली. त्यानंतर काशीमीरा पोलिसांचे एक पथक गुजरातच्या दिशेने रवाना झाले आणि निकिताला ज्या ठिकाणी पुरले होते त्याठिकाणी मॅजिस्ट्रेट, फॉरेन्सिक एक्स्पर्ट, पंच, स्थानिक पोलीस यांचे समक्ष खात्री करत निकिता हिचा जमिनीमध्ये पुरलेला मृतदेह मिळाला. पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्हातून आशिषला अटक केली. मात्र, हत्या समोर आल्याने ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली.