ETV Bharat / state

Thane Crime : धावत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची लूटमार करणारी सराईत चौकडी गजाआड; १० लाखांचा मुद्देमालही जप्त - लोहमार्ग पोलीस

अहमदाबाद-वसई-पुणे या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधून रात्रीच्या वेळेत किंमती ऐवज चोरणाऱ्या चार जणांना कल्याण लोहमार्ग गु्न्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून पाच मोबाईलसह १० लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Thane Crime News
लूटमार करणारी सराईत चौकडी गजाआड
author img

By

Published : Apr 27, 2023, 7:23 PM IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख माहिती देताना

ठाणे : धावत्या एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधून रात्रीच्या सुमारास दागिनेसह रोकड लंपास करणाऱ्या चार सराईत चोरट्यांना कल्याण लोहमार्ग गु्न्हे शाखेच्या पथकाने बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. रवी दशरथ गायकवाड (२८, रा.पुणे), गणेश सुरेश राठोड (२३, रा.पुणे), प्रकाश आश्रुबा नागरगोजे (२५, रा. पुणे), तानाजी शिवाजी शिंदे (२६, रा.संभाजीनगर) अशी अटक केलेल्या चोरट्याची नावे आहेत.

प्रवाशांची केली लूटमार: कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद-वसई-पुणे या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील दागिने, मोबाईल, रोख रक्कम प्रवासी रात्रीच्या सुमारास झोपल्याचा फायदा घेत, चोरटे प्रवाशांची लूटमार करीत होते. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यांचा तपास रेल्वे पोलिसांनी सुरू केला होता. तपासादरम्यान चोरीच्या घटना घडलेल्या रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी काही संशयित चेहऱ्यांची खबऱ्याकडून ओळख पटवली होती.

रवी गायकवाडला ताब्यात घेतले: त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातून रवी दशरथ गायकवाडला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या इतर दोन सराईत चोरटे विविध तालुक्यातून आणि एक चोरट्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक केली. या चारही अटक चोरट्याकडून पाच मोबाईलसह १० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हे केल्याची कबुली दिली: रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार या सराईत चौकडीने, कल्याण डोंबिवली, ठाणे, कर्जत रेल्वे स्थानकातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण आठ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. हे चारही चोरटे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर बुलढाणा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली आहे. या चारही चोरट्यांना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

दरम्यान लोहमार्ग पोलीस आयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे, उपायुक्त मनोज पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती तपास अधिकारी अरशुद्दीन शेख यांनी दिली आहे. चारही चोरट्याकडून कर्जत, डोंबिवली, ठाणे, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत धावत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे लंपास केलेले दागिने, मोबाईल हस्तगत केले आहेत. शिवाय या चोरट्यांकडून राज्याच्या विविध भागातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता तपास अधिकारी अरशुद्दीन शेख यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Thane Crime दीड कोटीच्या हस्तिदंतासह दोघे पोलिसांच्या जाळ्यात गुन्हे शाखा युनिट५ च्या पथकाची धडक कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.