ETV Bharat / state

kalwa Encroachment : एकीकडे घरात लागले एसी, तर दुसरीकडं दहा दिवसांची बाळं उघड्यावर...; कळवा खाडीतील अतिक्रमणावर प्रशासनाची कारवाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 10:35 PM IST

kalwa Encroachment : ठाण्यातील कळवा खाडीतील झोपड्यांवर महापालिका प्रशासनाने बुलडोजर फिरवलाय. यामुळं शेकडो कुटुंब बेघर झाली आहेत, तर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आल्याचे दिसले. मात्र या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका उपायुक्त शंकर पाटोळेंनी नुकतेचं सांगितलंय.

kalwa Encroachment
kalwa Encroachment
कळवा खाडीतील अतिक्रमणावर प्रशासनाची कारवाई

ठाणे kalwa Encroachment : ठाण्यातील कळवा खाडीतील बेकायदा झोपड्यांवर नुकतेचं प्रशासनानं बुलडोझर फिरवला. त्यानंतर शेकडो कुटुंबं बेघर झाली. कष्टानं जमवून उभं केलेलं संसार क्षणांत उद्धवस्त झाले. नवजात बाळ कुशीत घेऊन अनेक माता अंधारात रात्रं काढण्यास मजबूर झाल्या. सर्व बेघर माता भगिनी व आबालवृद्ध डोळ्यात पाणी आणून आपल्या व्यथा मांडताना दिसले. (kalwa Encroachment)

मागिल ३५-४० वर्षांपासून याच झोपड्यांत चालला संसार : अनधिकृत झोपडपट्ट्या म्हणजे शहरांना लागलेली कीड अशी अनेक विशेषणं आपण नेहमीच ऐकतो. परंतू, त्या झोपड्यांमध्ये राहणारे देखील आपल्यासारखीच माणसे आहेत, हे आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यांना देखील आपल्यासारखंच दोन वेळच्या जेवणाची भूक असते. आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंताही असते. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा मिळाव्यात यासाठी अनेक योजना येतात. परंतू, दरवेळेला झोपडपट्ट्या उभ्याच राहतात. अशीच एक झोपडपट्टी थेट कळवा खाडीत उभारण्यात आली होती. कुठेतरी आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक कुटुंबांनी आपल्या घामाचा पैसा घालून इथं झोपड्या घेतल्या.

उड्डाणपुलाखाली आश्रय घ्यावा लागला- गेल्या ३५-४० वर्षांपासून याच झोपड्यांतील चार भिंतीत आपलं संसार थाटत अनेकानी आपल्या मुलाबाळांची लग्नंही केली व दुसऱ्या पिढीचे संसार उभे राहिले. परंतू, गेल्या काही वर्षात काही गुंडानी धाक, दमदाटीपणा करून, स्थानिकांना धमक्या देऊन १५ ते २० झोपड्या बांधल्या. इथेच शेकडो लोकांचे नशीब फिरले. पालिकेनं बुलडोजर लावून सगळ्या झोपड्या जमीनदोस्त केल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर अंधकार पसरला. पावसाळ्यात तोडक कारवाई करु नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही ही तोडक कारवाई ठाणे महानगरपालिकेने केली. यामुळे भर पावसात सर्व बेघरांना बाजूच्या उड्डाणपुलाखाली आश्रय घ्यावा लागला. लहान लहान लेकरं घेऊन स्त्रिया अंधारात मच्छरांचा सामान करत रात्र जागून काढत आहेत. रोगराई पसरण्याची भीती आणि अपुरे अन्नपाणी यामुळे सर्वजण बेजार झाले आहेत. त्यातच दोन महिला आपली दहा-बारा दिवसांची बाळं घेऊन चिंताग्रस्त दिसल्या.

आता बुलडोझर खाली जीव देवू : आम्ही इथं अनेक दशकांपासून रहात असून आमच्यावरच हा अन्याय का, असा टाहो याठिकाणी अनेकांनी फोडला. घरातून हाताला लागेल एवढंच सामान काढून घेऊन इतर सामान बुलडोजर खाली दफन झाले असं याठिकाणच्या लोकांनी सांगितलं. अन्नपाण्यावाचून अनेकजण इथं बसलेले दिसत होते. पोलीस आयुक्तांच्या मुख्यालयासमोरच एवढी मोठी झोपडपट्टी उभी राहिली तेव्हा पालिकेचे अधिकारी झोपले होते का, असा प्रश्न येथील पीडित विचारत आहेत. आधार कार्ड, विजेची बिलं, रेशन कार्ड असूनदेखील आज आम्ही रस्त्यावर आहोत. याला जबाबदार प्रशासन असून पात्र कुटुंबांना लवकरात लवकर हक्काची घर मिळावीत अशी मागणीही या लोकांनी केलीय.

आयुक्तांच्या आदेशाने कारवाई : या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून नव्याने झालेल्या बांधकामांवर प्रशासन कारवाई करत आहे. ही कारवाई पुढेही सुरू राहील. याआधी पाच वेळा अशी कारवाई झाली असल्याचं उपायुक्त शंकर पाटोळे यांनी सांगितलंय. या खाडीत भराव टाकून बांधकामावर पुन्हा उभे राहिल्यास त्यावर पुन्हा एकदा कारवाई केली जाईल, असंही पाटोळे यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : कळवा रुग्णालयाच्या शवागारातून रुग्णाचा मृतदेह हरवला... प्रशासनाकडून शोध सुरुच!
  2. Kalwa Hospital Thane : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे तांडव; 48 तासात 18 रुग्ण दगावले, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
  3. Kalwa Hospital Update : कळवा रुग्णालय रुग्ण मृत्यू प्रकरणातील चौकशी समितीचा अहवाल लांबला, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.