ETV Bharat / state

शहराच्या विकासासाठी मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला - गीता जैन - mla Geeta Jain news

मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला असे गीता जैन यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते.

Geeta Jain
अपक्षअपक्ष आमदार गीता जैनआमदार गीता जैन
author img

By

Published : Oct 26, 2020, 3:45 PM IST

Updated : Oct 26, 2020, 4:22 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदर शहराच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्यानंतर आज मीरा भाईंदर शहरातील पत्रकारांशी संवाद साधला. शहराच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला असे गीता जैन यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते.

अपक्ष आमदार गीता जैन

शहराच्या विकासासाठी मी शिवसेनेत

मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या प्रलंबित विकासाच्या कामाला गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे आमदार गीता जैन यांनी स्पष्ट केले. शहरातील घन कचरा प्रकल्प, पाणी टंचाई, मोठ्या नाल्यांच्या समस्या, भूमिगत गटार योजना, परिवहन सेवा, बी एस यु पी योजना या प्रलंबित विषयांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार, तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश आणणे व निवडणुकीत मीरा भाईंदरकरांना दिलेल्या नऊ वचनांची पूर्तता करणे, निविदा प्रक्रियामध्ये पारदर्शकता आणणे हे प्रमुख उद्दिष्टे ठेवून काम करणार आहे. तसेच येणाऱ्या काळात मीरा भाईंदर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार, असे गीता जैन म्हणाल्या.

भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे गीता जैन यांनी 2019 ची विधानसभा अपक्ष लढवली -

मीरा भाईंदर शहरातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. अपक्ष आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. गीता जैन या भाजपकडून लढण्यास इच्छूक होत्या, मात्र भाजपकडून तिकीट नाकारण्यात आले आणि भाजपचे तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांना पुन्हा संधी देण्यात आली. मात्र, मेहता यांच्या एकहाती कारभारावर खुद्द भाजपच्या नगरसेवक आणि ज्येष्ठ भाजप सदस्य नाराज होते. अखेर भाजपशी बंडखोरी करत गीता जैन यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहता यांचा गीता जैन यांनी दणदणीत पराभव केला.

गीता जैन यांना स्थानिक शिवसैनिकांसोबत जुळवून घ्यावे लागेल -

या निवडणुकीत शिवसेनेने संपूर्ण ताकद लावत छुपा पाठिंबा गीता जैन यांना दिला आणि तेव्हापासून गीता जैन यांची शिवसेनेशी जवळीक वाढली होती. मात्र, सत्ता स्थापनेच्या वेळी गीता जैन यांनी भाजपला पाठिंबा दिला. एकाच वर्षात भाजपकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्यामुळे गीता जैन या शिवसेनेत दाखल झाल्या. जैन यांच्या प्रवेशामुळे मीरा भाईंदर शहरात शिवसेनेनेची ताकद वाढणार असल्याची चर्चा आहे. मात्र, पुढील काळात गीता जैन यांना स्थानिक शिवसेनेसोबत काम करायचे आहे आणि त्या त्यांच्यासोबत कशा रुळणार हा येणार काळ ठरवेल. कारण, गीता जैन भाजपच्या महापौर असताना पर्युषण सण संदर्भात सेना भाजपमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिक स्वीकारणार का? हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Last Updated : Oct 26, 2020, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.