ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक खास गाणे तयार केले आहे. सावन का महिना या गाण्याच्या चालीवर त्यांनी मोदींवर आधारित गाणे गाऊन मोदींना टोला लगावला आहे. एक प्रकारे या गाण्यातून मोदींच्या कामकाजाबाबत आव्हाड निंदा करताना दिसत आहेत.
या गाण्याची ओळ आहे, चुनाव का महिना राफेल करे शोर, पुरी दुनिया बोले चौकीदार है चोर. हे गाणे आव्हाड यांनी स्वतः गायले आहे. गाण्याची व्हिडिओ क्लिप सध्या चांगली व्हायरल होत आहे. दोन मिनिट आणि ४० सेकंदाच्या या गाण्यातून आव्हाडांनी मोदी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.