ETV Bharat / state

Jitendra Awhad : राष्ट्रवादीच्या आव्हाडांना ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकण्याचा विश्वास

ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडाच फडकवू, असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाडांनी केल्यामुळे ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

jitendra awhad
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Aug 2, 2023, 5:30 PM IST

सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड

ठाणे : आपण काँग्रेसी विचारधारेचे असून शरद पवारांचे निष्ठावंत असलो तरीही आगामी ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवू असा शब्द जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकरांना दिला. गेले दीड वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात होत असलेली उलथापालथ पाहता, महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभी राहून गद्दारांना धडा शिकवेल असा विश्वास, आव्हाड यांनी व्यक्त केला.

घाबरलेले सरकार हिंमत दाखवत नाही : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी आणि शहापूर येथे घडलेल्या समृद्धी महामार्गावरील दुर्दैवी अपघातामुळे, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी मंत्री व राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते. राजन विचारांनी यावेळी बोलताना, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या ठाणेकर शिवसैनिकांचे भरभरून कौतुक केले. शिवसेनेतून फुटून गेलेल्यांना ठाणेकर जनता माफ करणार नाही, त्यांना जरूर धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारने आज निवडणूका जाहीर केल्या तर जनता नेमकी कोणाच्या बाजूने आहे हे सत्य बाहेर येईल. त्यामुळे तेवढी हिंमत घाबरलेले सरकार दाखवत नाही अशी टीका राजन विचारे यांनी केली.

महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवू : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून गेलेल्या नेत्यांची नावे न घेता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. जे सोडून गेले त्यांनी आपण कोणाचे बोट धरून या राजकारणात आलो आणि यशस्वी वाटचाल केली याचाही विचार केला नाही. पार्टी सोडून गेलेल्यांनी आपल्याला काहीच मिळाले नाही असे छातीठोकपणे सांगावे. परंतु ते सांगण्याची त्यांच्यात हिंमतच नाही असा टोला, आव्हाड यांनी लगावला. राजन विचारे हा एक निष्ठावंत शिवसैनिक असून आपला नेता आजारी असताना त्यांनी त्याची साथ सोडली नाही, याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. आपण काँग्रेसी विचारांचे आणि शरद पवारांचे निष्ठावंत असलो तरीही या ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडाच फडकवू असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. Sambhaji Bhide : 'संभाजी भिडेंना बुधवारपर्यंत अटक करा, नाहीतर..', जितेंद्र आव्हाडांचा अल्टिमेटम
  2. Jitendra Awhad Reaction: तुम्हाला नेमणूक करण्याचा अधिकार कोणी दिला - जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
  3. Jitendra Awhad On Sharad Pawar: शरद पवार आपली भूमिका कृतीतून दाखवतात, त्यांच्या भूमिकेवर शंका घेण्याचे कारण नाही- जितेंद्र आव्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.