ETV Bharat / state

Jitendra Awhad On Slum Dwellers : "तुम्ही त्यांना घर द्याल, मात्र अन्न..." आव्हाडांनी रेल्वेमंत्र्यांपुढे मांडली झोपडपट्टीधारकांची व्यथा - jitendra awhad railway minister

रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची व्यथा रेल्वेमंत्र्यापुढे मांडली ( Jitendra Awhad On Slum Dwellers ) आहे.

Jitendra Awhad
Jitendra Awhad
author img

By

Published : Feb 19, 2022, 3:58 PM IST

ठाणे - घरकाम, मजुरी करुन जगणाऱ्या आणि रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या गरिबांच्या व्यथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ( Railway Minister Ashwini Vaishnaw ), रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे व्यक्त ( Jitendra Awhad On Slum Home ) केली. आपण घर देऊ शकतो, मात्र त्यांना अन्न देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन त्यांच्या घराशेजारीच असलेल्या जागेवर करावे, अशी मागणीही आव्हाड यांनी रेल्वेमंत्र्याकडे केली ( Jitendra Awhad Redevelopment Railway Line home ) आहे.

सात दिवसांच्या आत झोपड्या खाली करा, अशा लाखो नोटिसा मध्य रेल्वेने मार्गालगत राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना दिल्या आहेत. त्यामुळे एकच भीती झोपडपट्टीधारकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देखील आल्याने हा विषय गंभीर बनला आहे. त्यावर राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने तोडगा काढने आवश्यक आहे. त्याच पार्श्वभुमीवर जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली.

जितेंद्र आव्हाड बोलताना

तर छातीचा कोट करून उभा राहीन

यापुर्वी नोटिसा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवली मध्ये या झोपडपट्टीधारकांची एक बैठक घेतली. यावेळी झोपड्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईच्या विरोधात छातीचा कोट करुन उभा राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

हेही वाचा - Nilam Gorhe warns BJP : लक्षात ठेवा तुमच्या सगळ्यांचा सातबारा आमच्याकडे- नीलम गोऱ्हेंचा भाजपला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.