ETV Bharat / state

जिल्हास्तरावर कार्यकर्त्यांसाठी जनता दरबार - नाना पटोले

राज्यात सत्ता असूनसुध्दा पक्ष कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. त्यामुळे आता जिल्हास्तरावर पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित करण्यात येतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच आगामी निवडणुका या स्वबळावर लढविण्याच्या दृष्टिकोनातून चाचपणी सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भिवंडीमध्ये नाना पटोले यांची बैठक
भिवंडीमध्ये नाना पटोले यांची बैठक
author img

By

Published : Mar 27, 2021, 7:25 PM IST

ठाणे - राज्यात सत्ता असूनसुध्दा पक्ष कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. त्यामुळे आता जिल्हास्तरावर पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित करण्यात येतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच आगामी निवडणुका या स्वबळावर लढविण्याच्या दृष्टिकोनातून चाचपणी सुरू आहे. त्यासाठी राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे. भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय व स्व.राजीव गांधी चौक नूतनीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

'त्या' नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई

भिवंडीमध्ये अठरा नगरसेवकांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. ही गंभीर बाब असून लवकरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, व त्यांचे नगरसेवक पद रद्द केले जाईल असेही यावेळी नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावेळी नगरसेवक रिषिका राका यांच्या पक्ष कार्यालयात महापालिका नगरसेवक,पदाधिकारी यांची विशेष बैठक नाना पटोले यांनी घेतली. या बैठकीला माजी मंत्री अरिफ नसीम खान, शहराध्यक्ष ऍड.रशिद ताहीर मोमीन, माजी महापौर जावेद दळवी, प्रदेश सचिव प्रदीप राका, प्रदेश सरचिटणीस तारीक फारुकी नगरसेवक रिषिका राका, काँग्रेस युवा नेते दयानंद चोरघे, मुख्तार खान यांची उपस्थिती होती.

पक्षाची शिस्त महत्त्वाची

काँग्रेस पक्ष कार्यालय हे कार्यकर्त्यांचे शक्तीकेंद्र आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयात समस्या घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचे मत ऐकून त्याचे निवारण करणे गरजेचे आहे. पक्षाची शिस्त पाळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. पक्ष मोठा आहे व्यक्ती नाही हे धोरण सर्वांनी मनामध्ये निश्चित करून घेणे गरजेचे आहे. यापुढे पक्षविरोधी कृती व काम करणाऱ्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधिंविरोधात शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्याचे काम काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात येईल, असा इशाराही यावेळी पटोले यांनी दिली आहे.

भिवंडी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्षपदाचा वाद मिटवणार

भिवंडी कॉंग्रेस शहर जिल्हा अध्यक्षपदावरून वाद सुरू असल्याने तो मिटवण्यासाठी लवकरच दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचे आश्वासन यावेळी नाना पटोले यांनी बैठकीत उपस्थित नगरसेवकांना दिले. मात्र यापुढे गटबाजी खपवून घेणार नाही. पक्षविरोधी कारवाई व ध्येय धोरणाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.