ETV Bharat / state

Thane Crime News: वाढीव परताव्याचे आमिष दाखवून चार कोटींचा चूना, बंटी बबलीच्या जोडीसह चार भामट्यांविरोधात गुन्हा - परताव्याचे आमिष दाखवून चार कोटींचा चूना

डोंबिवलीतील एका गुंतवणूकदाराला वाढीव व्याजाचे आमीष दाखवून युनिक कन्सलटन्सीचे मालक असलेल्या बंटी बबलीसह त्याच्या दोन भागीदारांनी चार कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाढीव व्याजाचा परतावा नाहीच, मूळ रक्कम परत मिळत नसल्याने गुंतवणूकदाराने अखेर रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

Thane Crime News
ठाणे गुन्हे न्यूज
author img

By

Published : Jun 3, 2023, 10:38 PM IST

ठाणे : जादा परतावा मिळण्याच्या आमिषाने अनेकदा गुंतवणूकदारांची फसवणूक होत असते. त्यामुळे अशा गुंतवणुकीच्या योजनांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने ठाण्यातील गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर बंटी बबलीच्या जोडीसह चार भामट्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक महेंद्र भानुशाली (वय, 45, रा. टिळकनगर, डोंबिवली) असे तक्रारदार गुंतवणूकदाराचे नाव आहे. तर युनिक कन्सलटन्सीचे मालक आणि भागीदार विनय पुरुषोत्तम वर्टी (वय, 68), गीता विनय वर्टी (वय, 60, रा. निळकंठ सोसायटी,, डोंबिवली पूर्व), असे बंटी बबलीच्या जोडीचे नाव आहे. तर डाॅ. सी. के. नारायण (वय 60, रा. गोवंडी, मुंबई ), श्रीधर ( वय, 50, मुंबई) अशी चार कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या भामट्यांची नावे आहेत.

गुंतवणुकीवर 10 टक्के परतावा आणि दुप्पट पैसे- पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रतिक भानुशाली यांना आरोपी विनय आणि गीता वर्टी या बंटी बाबलीसह मुबंईत राहणाऱ्या डॉक्टर असलेल्या भागीदारांनी युनिक कन्सलटन्सीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या गुंतवणूक योजनेत डिसेंबर 2021 मध्ये 60 लाख 50 हजार गुंतविण्यास तक्रारदाराला सांगितले होते. शिवाय या गुंतवणुकीवर 10 टक्के परतावा आणि वर्षभरात हे पैसे दुप्पट करुन देतो, असे आमिष दाखविले. पैशांबरोबर सोनेही देण्याची हमी आरोपी भामट्यांनी दिली होती. त्यानंतर वाढीव व्याज आणि सोने असे एकूण 4 कोटी रुपये भामट्यावर विश्वास संपादन करून तक्रारदार प्रतिक यांना गुंतविण्यास भाग पाडले होते.

बंटी बबलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे पडले महागात- तुम्ही गुंतविलेले पैसे शेअर बाजारात गुंतविल्याने अधिकचा परतावा कमी कालावधीत मिळेल. तुमची गुंतवणूक दाम दुप्पट होईल, असे आमिष आरोपी वर्टी पती, पत्नी असलेल्या बंटी बबलीच्या जोडीने प्रतिक यांना दाखविले. तसेच चार कोटीचे वर्षभरात 8 कोटी रुपये करुन देण्याची हमी दिली. झटपट आकर्षक परतावा आणि संपत्ती वाढणार असल्याने तक्रारदार प्रतिक यांनी या भामट्या बंटी बबलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.

गुन्हा नोंदवून पोलीस तपास सुरू- आरोपींनी दिलेला कालावधी उलटूनही आकर्षक व्याज मिळाले नाही. वेळकाढूपणाची उत्तरे आरोपी देऊ लागले. दोन वर्षे उलटली तरी आकर्षक परतावा नाही. पण मूळ रक्कमही आरोपींकडून परत मिळत नसल्याने ते आपली फसवूक करत आहेत, याची खात्री त्यांना पटली. प्रतीक भानुशाली यांनी युनिक कन्सलटन्सीचे मालक विनय आणि गीता वर्टी या बंटी बबलीसह त्यांच्या मुबंई राहणाऱ्या दोन भागीदारांविरुध्द रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा-

  1. Mumbai Crime : २० वर्षांपूर्वी पोलिसांनी गुंगारा देणाऱ्या सामूहिक हत्याकांडातील फरार आरोपीला अटक, मुंबई पोलिसांची कामगिरी
  2. Nashik Crime: लाचखोर अधिकारी सुनिता धनगरच्या घरी एसीबीला सापडली 85 लाखांची रोकड अन् 32 तोळे सोने!
  3. Shirdi Crime News: धुळफेकीचा फसला प्रयत्न, सोयाबीनमध्ये नेण्यात येणारा 50 लाखांचा गुटखा शिर्डी पोलिसांकडून जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.