ठाणे : ठाण्यामध्ये कायदा सुव्यवस्थाचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहावयला मिळत आहे. प्रवासी प्रसादे वाडेकर हे रोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रोज अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करतात. शनिवारी असाच प्रवास करत असताना ट्रेन कळवा आणि मुंब्रा स्थानकात आली असता एका गर्दुल्याने वाडेकर यांच्यासोबत हुज्जत घातली. नशेसाठी वापरले जाणारे केमिकल वाडेकर यांच्या अंगावर टाकून माचीसने आग लावली. केमिकलमुळे वाडेकर यांच्या डावा हात जळाला आहे. त्यांना मुंबईत पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून गुर्दुल्यांचा शोध सुरू आहे.
लोकलमध्ये सुरक्षित प्रवास : या हल्ल्यात जखमी झालेले वाडेकर यांना जन्मापासूनच बोलता येत नाही. हा हल्ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण अशा जाणाऱ्या लोकलमध्ये झाला आहे. हल्ला करणारा नशेखोर हा देखील दिव्यांग आहे. या संदर्भामध्ये ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत. मुंबईच्या लोकलमध्ये सुरक्षित प्रवास या वारंवार प्रशासनाने घोषणा देऊ नये.
लोकलमधील अवैध प्रकार : मुंबईच्या लोकलमधील अवैध प्रकार गुंडगिरी आणि नशेखोरी काही केल्या कमी होताना दिसत नाही. कारण पोलिसांचा हलगर्जीपणा हा सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. दररोज डझनवर बळी घेणाऱ्या लोकल सेवेमध्ये पोलीस दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी देखील असुरक्षित आहेत, याचा पुन्हा एकदा प्रत्यय मुंब्रा येथे राहणाऱ्या व्यक्तीने करून दाखवला आहे. किरकोळ भांडणातून दुसऱ्या दिव्यांगाला जाळून गंभीर हल्ला झाल्याने रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवरच आता प्रवाशांचा भरोसा राहिलेला नाही.
काही दिवसांपूर्वी लागले होते पोस्टर्स : या हल्ल्यानंतर अमली पदार्थांच्या तस्करीचा एक मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावरून उतरून अशाच गर्दुल्लांवरती कारवाई करण्यासाठी चक्क पोस्टर देखील लावले होते. पोलिसांची गस्त होत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच राहणाऱ्या महिला असुरक्षित असल्याच्या सांगत होत्या, असे असताना सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी करायचे तरी काय? असा प्रश्न आता उभा राहत आहे.