ETV Bharat / state

Turmeric Product in Thane: सेंद्रिय हळद लागवड, भात शेतीपेक्षा जादा नफा देणारे पीक

कोकणातील ठाणे जिल्हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्द आहे. या जिल्ह्यात हजारो हेक्टर जमिनीवर विविध जातीच्या भाताची शेती केली जाते. मात्र गेल्या काही वर्षात अवकाळी पावसापामुळे दरवर्षी भात पिके नष्ट होऊन त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात शेतीला पर्यायी जोड व्यवसाय म्हणून सेंद्रिय पद्धतीने हळद लागवडीच्या शेतीतुन आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. यामुळे भात शेतीपेक्षा जादा नफा देणारी सेंद्रिय हळद लागवड ठरल्याचे शेतकरी सांगतात.

Turmeric Product in Thane
सेंद्रिय हळद लागवड
author img

By

Published : Mar 1, 2023, 1:42 PM IST

भात शेतीपेक्षा जादा नफा देणारे हळद पीक

ठाणे: राज्यात पूर्वी काही पिकांची विशिष्ट भागातच लागवड केली जात होती. आता मात्र पीक पद्धतीत बदल होत असून सांगली-सातारा, विदर्भ, मराठवाडा, भागात घेतल्या जाणाऱ्या सेंद्रिय हळदीची लागवड आता कोकणातील ठाणे जिल्ह्यातील शेतकरी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वी किचकट मानले जाणारे सेंद्रिय हळद उत्पादन आता शेतकऱ्यांना लोखोंचे उत्पन्न देत आहेत. त्यामुळे शहापूर तालुक्यातील खर्डी नजीकच्या बेडेकोन व टेंभा येथील शेतकरी रामनाथ उंबरगोंडे व प्रकाश कोर यांनी आपल्या शेतावर भात पिकाला जोड धंदा म्हणून वायगाव व प्रगती जातीच्या हळदीची लागवड केली आहे.

लागवडीसाठी शेतकरी पुढे सरसावले: सेंद्रिय हळद काढणीची प्रक्रिया अवघड असल्याने शेतकरी लागवडीला कचरत असतात. नवखे शेतकरी हळदीच्या लागवडीचा विचारही करत नव्हते. आता मात्र ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुढे सरसावले असून सेंद्रिय हळदीची पिके घेत एकरी आठ-दहा लाख रुपयांचेही उत्पन्न घेत आहेत. सेंद्रिय हळद ही शेतावर अंतरपीक म्हणून ही घेता येते, हळदीच्या काढणीसाठी लागणारे मनुष्यबळ, तसेच काढणी झाल्यावर शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणार लाकूडफाटा, तसेच सदर हळद सुकवून पुन्हा मशीनमध्ये तिची पावडर बनवून ती पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारात आणली जाते.

शेततीला जोड धंदा: ही हळद पूर्णपणे सेंद्रिय व आयुर्वेदिक असल्यामुळे तिला बाजारात एका किलो मागे ३५० ते ४०० रुपये भाव मिळत आहे. पुढील काळात ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळद लागवड होऊन शेतकऱ्यांना जोड धंदया सोबत चांगला आर्थिक फायदा ही होऊ शकतो असा विश्वास सेंद्रिय हळद लागवडीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सेंद्रिय हळद आरोग्याविषयी गुणकारी असल्याने राज्य शासनाकडून सेंद्रिय हळद पिकाला एका हेक्टरी मागे बारा हजार रुपये सबसिडी देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शिवाय १८ ते २० किलो बियाणेपासून ३०० ते ४०० किलो ओली हळदीचे उत्पन्न मिळत असून या हळदीला सुकवून त्यानंतर त्याची पावडर करून बाजारात विक्री करीत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

औषधी गुणधर्म असल्यामुळे हळद: शुभकार्यात, आहारात अविभाज्य घटक असलेल्या हळदीचे महत्त्व आहे. यामध्ये मूलतः औषधी गुणधर्म असल्यामुळे हळदीला आयुर्वेदामध्ये पर्यायाने मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. हळदीची लागवड अगदी प्राचीन काळापासून भारतात होते. शेतकरी हळद पिकवतो. हळदीचे व्यावसायिक महत्त्व शेतकऱ्यांना उमगले आहे. हळदीला स्थानिक बाजारपेठेसह कार्पोरेट बाजारपेठ खुणावू लागले आहे. जर शेतकऱ्यांनी व्यावसायिक तत्त्वावर हळदीची लागवड केल्यास हे पीक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बदलून टाकेल.

हेही वाचा: Thane News मिरच्यांच्या ठसक्याबरोबरच मसालाचे दरही वाढले बाजारपेठामधील विक्रीवरही परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.