ETV Bharat / state

भिवंडीत वाढलेला दीड टक्का कोण्याच्या पारड्यात; युती-आघाडीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली - congress

यंदाचा वाढलेला दीड टक्का कोण्याच्या पारड्यात पडला हे निकालानंतर स्पष्ट होणार असून वाढलेल्या मतांमुळे युती-आघाडीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

भाजप उमेदवार खासदार कपिल पाटील, काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे
author img

By

Published : May 1, 2019, 9:58 PM IST

ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघात ३७ टक्के असलेल्या कुणबी समाजाने महायुती, महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही प्रमुख पक्षांना मतदान केल्याने त्यांच्या मतांची विभागणी झाली आहे. २१ टक्के मुस्लीम मतदारांपैकी ९० टक्के मते काँग्रेसच्या पारड्यात पडल्याच्या शक्यतेने अनपेक्षित निकाल लागल्याची शक्यता आहे. तसेच, यंदाचा वाढलेला दीड टक्का कोण्याच्या पारड्यात पडला हे निकालानंतरच स्पष्ट होणार असून वाढलेल्या मतांमुळे युती-आघाडीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत सरासरी ५१.६१ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानात अवघ्या दीड टक्क्यांनी वाढ झाली असून ५३.०७ टक्के मतदान झाले आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी ग्रामीण ६५.६२, शहापूर ५९.८५, भिवंडी पश्चिम ५०.८१, भिवंडी पूर्व ४६.९३, कल्याण पश्चिम ४३.७, मुरबाड ५६.६४ असे एकूण ५३.०७ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे भिवंडी लोकसभेत १५ टक्के आगरी समाज असल्याने भाजप व काँग्रेसने आगरी समाजाचे उमेदवार दिले. मात्र, ३७ टक्के कुणबी, दलित-मुस्लीम ३० टक्के या गणिताचा आधार घेत वंचित आघाडीने कुणबी समाजाचा उमेदवार उभा करून कुणबी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार खासदार कपिल पाटील, काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे, बहुजन वंचित आघाडीचे डॉ. अरुण सावंत, सपा-बसपा पार्टीचे डॉ. नुरुद्दीन अंसारी यांच्यासह १५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. गुरूवार २३ मे रोजी मौजे भावाळे येथील प्रेसिडेन्सी हायस्कुलमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन वंचित आघाडीसह विविध अपक्ष उमेदवारांमध्ये निवडणूक निकालाविषयी कमालीची उत्सुकता आहे. या निवडणुकीसाठी ५ लाख ६९ हजार ९७५ पुरुष तर, ४ लाख ३२ हजार ८९७ महिलांनी तसेच १६ तृतीय पंथीयांनी असे एकूण १० लाख २ हजार ८८८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ५३.०७ टक्के मतदान झाले आहे.

२००९ ला लोकसभेतील मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भिवंडी हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यावेळी वेळी भाजपतर्फे जगन्नाथ पाटील यांनी निवडणूक लढवत १ लाख ४१ हजार ४२८ मते मिळवली होती. तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना १ लाख ८२ हजार ७८९ मताधिक्य मिळवत निवडून आले होते. मात्र, २०१४च्या निवडणुकीत सुरेश टावरे यांना डावलून कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांना जातीचे गणित मांडत मुस्लीम व कुणबी मतदान काँग्रेसला होईल. या आशेने काँग्रेसचे तिकीट विश्वनाथ पाटील यांना दिले गेले. मात्र, मोदी लाटेत काँग्रेसचे गणित बिघडले अन् कपिल पाटील विजयी झाले. त्यावेळी मनसेच्या तिकिटावर सुरेश म्हात्रे (बाळा मामा) यांनाही ९३ हजार ६४७ मतदान झाले होते.

लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा येतात. त्यापैकी मुरबाड, कल्याण पश्चिम, भिवंडी पश्चिम, विधानसभेमध्ये भाजपचे असे ३ आमदार आहेत. तर भिवंडी पूर्व, भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेचे २ आमदार आहेत. तर शहापुरात १ राष्ट्रवादीचा आमदार आहे. विधानसभा निहाय टक्केवारी पाहता गेल्यावेळी कपिल पाटील यांना कल्याण पश्चिममधून १ लाख मतांच्या जवळपास लीड होता. यंदा मात्र, याच विधासभेत सर्वात कमी मतदान झाले. तर सर्वात जास्त मतदान भिवंडी ग्रामीण विधानसभेत झाले. यामुळेही अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे. तर शहापूर, मुरबाडमध्ये काँग्रेसने भाजपच्या बरोबरीने मतदान घेतल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला. तर भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभेत मुस्लीम मतांचे विभाजन होणार असा अंदाज होता. मात्र, या दोन्ही मतदारसंघातील मुस्लीम मतदारांपैकी ९० टक्के मतदान काँग्रेसच्या पारड्यात पडल्याने मुस्लीम मताचे विभाजन १० टक्केच होवून काही मत समाजवादी आणि वंचित आघाडीच्या पारड्यात पडली.

मातब्बरांच्या बंडखोरीमुळे भाजप-काँग्रेसचे गणित बिघडले

निवडणुका जाहीर होताच २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील आणि युतीच्या विरोधात शिवसेनेचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा या दोघांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केले होते. मात्र, अपक्ष लढवून भाजपचे खासदार कपिल पाटील यांना मात देऊ शकत नाही. त्यामुळे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी अर्ज मागे घेत, भाजपला विरोध कायम ठेवत काँग्रेसला मदतीचा हात दिला. तर विश्वनाथ पाटील यांना यंदा काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत, भाजपला साथ दिली. यामुळे कुणबी सेना विखुरली गेली. त्यातच कुणबी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शरद पाटील यांनी काँग्रेसला साथ दिली. तर त्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी वंचित आघाडीला मदत केली. यामुळे कुणबी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. तर वाढलेला दीड टक्का कोण्याच्या पारड्यात पडला हे तर निकालानंतर स्पष्ट होईल.

बीड शहीद जवान शेख तोसिफ यांचा फोटो ...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.