ETV Bharat / state

ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या घटनांत वाढ, 18 दिवसांत आठ घटना - ठाणे क्राइम बातमी

ठाण्यात पोलिसांनी नाकेबंदी आणि सतर्कतेनंतरही सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांची वाढलेली गस्त व नाकाबंदी यामुळे दुचाकीवरुन सोनसाखळी चोरणारे चोरटे नव्या शक्कली लढवत आहेत.

नाकाबंदी
नाकाबंदी
author img

By

Published : Dec 22, 2020, 10:12 PM IST

ठाणे - ठाण्यात पोलिसांच्या नाकेबंदी आणि सतर्कतेनंतरही सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र ठाण्यात स्पष्ट होत आहे. अवघ्या 18 दिवसांत एकूण 8 सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या आठ घटनांमध्ये सहा घटनात महिलांना टार्गेट केलेले दिसत आहे. रस्त्याने चालणाऱ्या महिला असुरक्षित असतानाच आता पुन्हा चोरटे ज्येष्ठ नागरिकांवर पाळत ठेवून घरात घुसून स्त्रीधन घेऊन पसार होत आहेत. पोलिसांची गस्त वाढलेली असल्याने चोरटे सोनसाखळी चोरण्यासाठी नव-नवी शक्कल शोधत आहेत.

घटनास्थळ व घटलेला प्रकार सांगताना महिला

कोविडमुळे महिला आणि जेष्ठ नागरिक हे घरातून बाहेर पडत नसल्याने आणि ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने चोरट्यांच्या सोनसाखळी खेचण्याच्या प्रकारात टाळेबंदीमध्ये घट झाली होती. आता मोकळीक झाल्यानंतर 1 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत 8 घटना उघडकीस आल्या आहेत.

आठ घटना खालीलप्रमाणे

  1. 4 नोव्हेंबरला चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या 38 वर्षीय व्यक्तिच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचली.
  2. 6 नोव्हेंबरला भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुुचाकीवर मागे बसलेल्या 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचली. यात दुचाकीवरील महिला पडून जखमीही झालेली आहे.
  3. 9 नोव्हेंबरला हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी जाणाऱ्या 26 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी रिक्षातून जाणाऱ्या चोरट्यांनी खेचली.
  4. 9 नोव्हेंबरला टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पायी जाणाऱ्या 29 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचली
  5. 10 नोव्हेंबरला चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचली.
  6. 13 नोव्हेंबरला चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी जाणाऱ्या 58 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचली.
  7. 15 नोव्हेंबरला नौपाडा येथून पायी जाणाऱ्या 40 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचली
  8. 18 नोव्हेंबरला श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 55 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली.

सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. पोलिसांकडून गस्ती वाढविण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा - पिसे डॅम परिसरातून 1 कोटींहून अधिक रकमेचे अमली पदार्थ जप्त

हेही वाचा - वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी भगत यांची दुसऱ्यांदा निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.