ETV Bharat / state

Kopri Bridge Inauguration : मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका; कोपरी रेल्वे पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - कोपरी पूल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे लोकार्पण करण्यात आले. या पुलामुळे मुंबई, ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांची वाहतुक कोंडीपासून सुटका होणार आहे.

Inauguration Kopri Bridge
कोपरी रेल्वे पुलाचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण
author img

By

Published : Feb 9, 2023, 9:50 PM IST

कोपरी रेल्वे पुलाचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

ठाणे : णे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या पुलाच्या रुंदीकरणामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवरील वाहतूक कोंडी दूर होऊन ती सुरळीत होणार आहे.

Inauguration Kopri Bridge
कोपरी रेल्वे पुलाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

वाहतूक कोंडी दूर : या पुलाचे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामासाठी प्राधिकरणकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी ७८४ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे.

Inauguration Kopri Bridge
कोपरी रेल्वे पुलाचे शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

लहान तसेच अवजड वाहनांना फायदा : पूर्व द्रुतगती महामार्गावर हा ५+५ मार्गिकांचा आहे. तर, ठाणे शहरातील कोपरी रेल्वे ओलांडणी पुल हा २+२ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण, बांधकाम करण्यात आले आहे. २+२ पथ मार्गिकेच्या पुलाचे ४+४ असे अपग्रेड केल्यामुळे मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे.

Inauguration Kopri Bridge
कोपरी रेल्वे पुलाचे लोकार्पण

पादचारी पूल देखील बांधण्यात आला : या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेज पर्यंत महामार्गाखालून वाहनांच्या रहदारीसाठी २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.२ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वाहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणारा बंधिस्त नाल्याचे सुधारीकरण देखील करण्यात आले आहे.

मुंबई,ठाणे जिल्ह्यांना जोडणारा दुवा : कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे व्यस्त तासांत (पीक अवर्स) मध्ये वाहनचालकांना काही मीटरचा प्रवास करण्यासाठी ३०ते ४० मिनिटे लागतात. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा आता हा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी कापला केक : कोपरी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी केक कापण्यात आला. उपस्थित मान्यवरांना मुख्यमंत्री महोदयांनी केक भरवून वाढदिवस साजरा केला. आमदार प्रताप सरनाईक यांनी धनुष्यबाणाचे प्रतीक यावेळी मुख्यमंत्री यांना भेट दिले.

कोपरी पुलाचा इतिहास : 10 ऑक्टोबर 2021मध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या कोपरी पुलाच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले होते. बांधकाम होऊन देखील गेले अनेक महिने या मार्गिकाचे उद्घाटन करण्यात आले नव्हते. कारण मनसेने या ब्रिजला तडे गेल्याचे उघडकीस आणून आंदोलन केले होते. त्यानंतर आयआयटीमार्फत पुलाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात आला होता. मुंबई आणि ठाण्याला जोडण्यासाठी रेल्वे मार्गावरून जाणारा 4 मार्गिकेचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने 1958 साली उभारला. त्यालाच कोपरी ब्रिज असे नाव पडले.

वाहतूक वाढल्याने 1995 नंतर एमएमआरडीएने पुलाच्या बाजूला दोन मार्गिका वाढवल्या. मात्र, त्यानंतर ठाणे आणि मुंबई शहराचा प्रचंड विकास झाला, त्यामुळे फक्त चार मार्गिकेचा असलेला कोपरी ब्रिज वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला. त्यात 22 जून 2017 ला रेल्वेवरील ब्रिज आयआयटीच्या सर्वेक्षणात हा पूल धोकादायक निष्पन्न झाल्याने या पुलाचे तातडीने पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या पुलाच्या विस्तारीकरणासाठी मंजुरी मिळाली. त्यासाठी 258 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अखेर 21 मे 2018 ला या पुलाच्या पुनर्निर्माण कार्याचे भूमिपूजन करण्यात आले होते .

हेही वाचा - ST Employees Salary Issues : वेळेवर निधी न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार, पीएफ, ग्रॅच्युइटी रखडली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.