ठाणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभाग सतर्क झाला असून दिवाळीत मिठाई मधील भेसळीच्या वाढते प्रकार पाहता अन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाईसाठी लागणाऱ्या माव्याच्या वाहतुकीवर करडी नजर ठेवली आहे. त्यातच आज सकाळच्या सुमारास गुजरात हुन कल्याणमधील काळा तलाव परिसरात मावा घेऊन आलेला एक ट्रक अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. या माव्याची शुद्धता तपासण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन माव्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले आहे.
शुद्धतेची तपासणीसाठी प्रयोगशाळेत सँपल याबाबत मावा व्यापारी जयदीप सानप यांनी दिवाळी दरम्यान मिठाई विक्रीचे प्रमाण वाढते बऱ्याच प्रमाणात भेसळयुक्त मावा येत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासन विभाग दरवर्षी नियमाप्रमाणे आमच्या दुकानात येऊन सॅम्पल घेत असतात यंदा देखील शुद्धतेची तपासणी करण्यासाठी सँपल घेतले असल्याचे सांगितले. आता माव्याच्या शुद्धतेची तपासणीसाठी प्रयोगशाळेत सँपल पाठवून त्याच्या तपासणी अंतीच मावा भेसळयुक्त आहे की शुद्ध आहे हे स्पष्ट होणार आहे. मात्र दिवाळीच्या पहिल्याच्या दिवशी लाखोंचा मावा पकडल्याने जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.