ETV Bharat / state

ठाणे : हातात तलवारी घेऊन नाचणाऱ्या तिघा तरुणांवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 22, 2021, 6:57 PM IST

माघी गणेशोत्सव विसर्जनापूर्वी हातात तलवारी घेऊन नाचणाऱ्या तिघा तरुणांविरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणांनी हातात तलवारी घेऊन नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

youth swung sword thane
तरुण तलवारी प्रकरण ठाणे

ठाणे - माघी गणेशोत्सव विसर्जनापूर्वी हातात तलवारी घेऊन नाचणाऱ्या तिघा तरुणांविरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणांनी हातात तलवारी घेऊन नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनतर पोलिसांनी या व्हिडिओमधील नाचणाऱ्या तरुणांचा शोध घेतला. हे तरुण कल्याण तालुक्यातील आणे-भिसोळ गावातील रहिवाशी असल्याचे समोर आले. चेतन सुरोशी, रोहित सुरोशी आणि अन्य एक अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातात तलवारी नाचवताना तरुण

हेही वाचा - धक्कादायक! विजेचा शॉक लागून मुलाचा जागेवरच कोळसा! नवी मुंबईतील ऐरोलीमधील घटना

पोलिसांनी घेतली गंभीर दखल

कल्याण तालुक्यातील आणे-भिसोळ गावात माघी गणेशोत्सव साजरा केला जात होता. त्यातच आरोपी चेतन सुरोशी, रोहित सुरोशी व इतर मित्रांनी माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनापूर्वी घरासमोरील अंगणात हातात तलवारी घेऊन बेधुंद नाच केला. त्यांच्या नाचण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तरुणांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी राजू वंजारे यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी हातात तलवार नाचवणाऱ्या नवरदेवावरही कारवाई

कल्याण पूर्वेतील तिसगाव येथे हळद समारंभात हातात तलवार घेऊन नाचणाऱ्या नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - भाजपबरोबर युती करुनच आमचे काही नगरसेवक निवडून येतील- केंद्रीय मंत्री आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.