ETV Bharat / state

अनैतिक संबधाच्या संशयातून पत्नीची हत्या; फरार पतीला उल्हासनगरमध्ये अटक - zarkhand murder

झारखंड राज्यामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या करून एक व्यक्ती फरार झाला होता. त्याला आज उल्हासनगर येथून अटक केली.

wife murder
अनैतिक संबधाच्या संशयातून पत्नीची हत्या; फरार पतीला उल्हासनगरमधून अटक
author img

By

Published : Mar 15, 2020, 5:44 PM IST

ठाणे - अनैतिक संबधाच्या संशयातून पत्नीची हत्या करून झारखंड राज्यातून फरार झालेल्या पतीला उल्हासनगर पोलिसांनी शहाड रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. झारखंड राज्यातील धापाडा मशंनजोर पोलीस ठाण्यात त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुबेर सफिजुल शेख (वय, २०) असे पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. तर सीमा असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे.

अनैतिक संबधाच्या संशयातून पत्नीची हत्या; फरार पतीला उल्हासनगरमधून अटक

हेही वाचा - तब्बल पाचशेहून अधिक घरफोड्या... अट्टल गुन्हेगाराच्या सोलापूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

उल्हासनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांना रविवारी (आज) पहाटेच्या सुमाराला बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दोन दिवसांपूर्वी झारखंड राज्यातून पत्नीची हत्या करून एक व्यक्ती फरार झाला असून आता तो उल्हासनगर आला आहे. ही माहिती मिळताच पोलीस उपायुक्त पी.पी. शेवाळे यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दोन पोलीस पथके आरोपाला पकडण्यासाठी रवाना केली होती. एका पोलीस पथकाला आज पहाटेच्या सुमाराला आरोपी पळून जाण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकात आला असताना पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, पत्नीचे पर पुरुषाशी संबध असल्याने तिची गळा आवळून हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. आरोपी जुबेर सफिजुल शेख हा मूळचा पश्चिम बंगालमधील टाउन जिला मारवाडी जिल्ह्यातील मालदा गावात राहणारा आहे. या आरोपीला पुढील तपासासाठी झारखंड राज्यातील धापाडा मशंनजोर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.