ETV Bharat / state

भिवंडी तालुक्यातील दोन केंद्रावर पहिल्याच दिवशी 210 जणांनी घेतली लस

author img

By

Published : May 1, 2021, 10:27 PM IST

1 मे पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भिवंडी तालुक्यातील दिवाअंजुर आणि शहापूर तालुक्यातील शेंद्रुण येथे 210 जणांनी लस घेतली.

thane
ठाणे

ठाणे - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य शासनामार्फत 1 मेपासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील दिवाअंजुर आणि शहापूर तालुक्यातील शेंद्रुण या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लसीकरण करण्यात आले. यामध्ये अनुक्रमे 139 आणि 71 असे एकूण 210 नागरिकांनी लस घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेघे यांनी दिली. तसेच 'मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाइन बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे फक्त लसीकरण होणार आहे. इतर नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी करू नये', असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेघे यांनी केले आहे.

भीवंडीतील ग्रामीण भागात 210 जणांनी घेतली कोरोना लस

लसीकरणासाठी ऑनलाइन बुकिंग करा

सध्या राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण फक्त ऑनलाइन बुकिंगद्वारे होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी www.cowin.gov.in या वेबसाइटवर नोदणी करावी. वेबसाइटवर सांगितल्याप्रमाणे माहिती भरुन उपलब्ध लसीकरण सत्रांमध्ये ऑनलाइन appointment घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन बुकींगनंतरही खात्री करून लसीकरण

'Online appointment नंतर रजिस्टर मोबाइल नंबरवर appointment बद्दल खात्रीचा मेसेज येईल. त्यानंतर लसीकरणाच्या दिवशी appointment च्या वेळेत लसीकरण केंद्रावर appointment slip व Online booking साठी वापरलेले फोटो, ओळखपत्र घेऊन आलेल्यांनाच लसीकरण करण्यात येईल', अशी माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.

हेही वाचा - कडक निर्बंधामध्ये भुकेल्यांसाठी संभव फाऊंडेशन ठरले अन्नदाता

हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे 3 हजार 908 नवे रुग्ण, 90 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.