ETV Bharat / state

आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोन आरोपींना तीन वर्षाचा तुरुंगवास - अल्पवयीन अत्याचार

जिल्हा सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना दोषी ठरवित तीन वर्ष कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. इंद्रसेन उर्फ बंटी रमेश ठाकरे व गणेश बाबु मुळे असे शिक्षा झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

in child abused case court Punished  Criminal
आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपींना तीन वर्षांची शिक्षा
author img

By

Published : Jan 5, 2020, 4:35 PM IST

ठाणे -भिवंडी तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली. या गुन्ह्याच्या अंतिम सुनावणीवेळी जिल्हा सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना दोषी ठरवित तीन वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. इंद्रसेन उर्फ बंटी रमेश ठाकरे व गणेश बाबु मुळे असे शिक्षा झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा - यवतमाळमध्ये क्रेडिट कार्डद्वारे २ लाखांचा गंडा; मुख्य सूत्रधार मध्य प्रदेशमधील

6 डिसेंबर 2013 रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परतलेल्या अल्पवयीन मुलीला आईने दूध आणण्यासाठी नाक्यावर पाठविले असता, दूध घेऊन घरी येत असताना तिचा दोघांनी विनयभंग केला. त्यांनतर घडलेल्या घटनेबाबत घरच्यांना काही सांगितल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या आशा भोईर यांनी पीडितेच्या कुटुंबाला मदत केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून इंद्रसेन उर्फ बंटी रमेश ठाकरे व गणेश बाबु मुळे याच्या विरोधात भादंवि कलम 354 अ, 504, 506, 34 अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा कलम 7, 8 यानुसार गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी करीत होते. "पोलिसांनी दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे तपास केल्यानेच या गुन्ह्यात पीडित आदिवासी मुलीस न्याय देण्यात यश आले आहे." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या आशा भोईर यांनी दिली.

हेही वाचा - अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बदनामीच्या भीतीने मुलीने घेतले उंदीर मारायचे औषध

Intro:kit 319Body:आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोन आरोपींना नायालयाने ठोठावली तीन वर्षांची शिक्षा

ठाणे : भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तीला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्यात दोघा विरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली . याच गुन्ह्या प्रकरणी अंतिम सुनावणी वेळी जिल्हा सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना दोषी ठरवीत तीन वर्ष कारावास व तीन हजार रुपय दंडाची शिक्षा सुनावली आहे. इंद्रसेन उर्फ बंटी रमेश ठाकरे व गणेश बाबु मुळे (दोघे रा. अंबाडी )असे शिक्षा झालेल्या दोघं आरोपींची नावे आहेत .
या बाबत अधिक वृत्त असे कि, 6 डिसेंबर 2013 रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परतलेल्या अल्पवयीन मुलीला आईने दूध आणण्यासाठी नाक्यावर पाठविले असता दूध घेऊन घरी येत असताना रस्त्याकडेला गावात कपात असलेले आरोपी इंद्रसेन उर्फ बंटी रमेश ठाकरे याने पीडितेस रस्त्यात अडवून तू माझ्याशी मैत्री करणार का असे बोलून तिचा हात पकडून खाली पडले. त्यावेळी त्याचा साथीदार गणेश बाबु मुळे याने तिची ओढणी खेचून दोघांनी तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केला. त्यांनतर घडलेल्या घटनेबाबत घरच्यांना काही सांगितल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या बाबत पीडितेने आपल्या पालकांसोबत नजीकच राहणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या आशा भोईर यांना ही हकिकत सांगितल्या वर आशा भोईर या पीडितेसह गणेशपुरी पोलीस ठाणे गाठून त्याठिकाणी दोघां विरोधात तक्रार केली . या तक्रारी नुसार गणेशपुरी पोलिसांनी इंद्रसेन उर्फ बंटी रमेश ठाकरे व गणेश बाबु मुळे यांच्या विरोधात भादंवि कलम 354 अ ,504,506,34 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 [1] [11 ] ,6 व बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा कलम 7,8 या नुसार गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी करीत या बाबत जिल्हा सत्र नयायलाय सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान सर्व साक्षी पुरावे तपासून जिल्हा सत्र न्यायाधीशांनी या प्रकरणी आरोपी इंद्रसेन उर्फ बंटी रमेश ठाकरे व गणेश बाबु मुळे या दोघांना दोषी ठरवीत तीन वर्ष करावासासह तीन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून पोलिसांनी दबावाला बळी न पडता निपक्षपाती पणे तपास केल्यानेच या गुन्ह्यात पीडित आदिवासी मुलीस न्याय देण्यात यश आले असल्याची प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेच्या तालुका पदाधिकारी आशा भोईर यांनी दिली आहे .

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.