ठाणे - गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या भक्ती-भावात झाले. त्यातच भिवंडी महापालिकेअंतर्गत 10 गणेश घाट येत असून या गणेश घाटांवर असलेले जीवन रक्षक यांना पालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्याने जीवन रक्षकांसह सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ नाराज असल्याचे दिसून आले आहे.
आज दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जन वेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकाऱ्यांनी गेल्या 10 वर्षांपासून जीवनरक्षकांच्या रक्षणासाठी लाईफ जॅकेट तसेच त्याचे विमा योजना काढण्याची मागणी सातत्याने करत आहेत. परंतु पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. जर या जीवन रक्षकांना काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे आज दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होत आहे. परंतु पालिका प्रशासनाला शहरातील खड्डे दिसत नाहीत. येत्या दोन दिवसात शहरातील खड्डे बुजवले नाहीत. तर 5 व 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होऊ देणार नसल्याचे सांगत मोठा आंदोलन छेडण्याचा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.
हे ही वाचा -Mumbai Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीच झाली पाहिजे - देवेंद्र फडणवीस
मुस्लीम बांधवाकडून गणरायाचे विसर्जन -
पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करून देखील पालिका प्रशासन जीवन रक्षकांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा देत नसल्यामुळे गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकाऱ्यांनी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांच्याकडे जीवन रक्षकांसाठी सुविधा करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे शेलार गणेश घाट तसेच लोकमान्य टिळक गणेश घाट या ठिकाणी मुस्लीम बांधवाकडून विसर्जन करत असतात. महामंडळाच्या मागणीनुसार आमदारांच्या वतीने जीवन रक्षकांसाठी तब्बल 100 लाईफ जॅकेट उपलब्ध करण्यात आले असून आज त्यांचे वितरण महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
हे ही वाचा - Saki Naka Rape Case: बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, नराधमाला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी