ETV Bharat / state

Illegal Chemical Stock Seized: भिवंडीत १ कोटी ८० लाख रुपयांच्या अवैध रसायनांचा साठा जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - अवैध केमिकल साठा जप्त

Illegal Chemical Stock Seized: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात (Chemical stock seized in Bhiwandi) अवैधरित्या रसायनांचा साठा करणाऱ्या गोदामांवर पोलिसांनी छापेमारी (police raid chemical godown) केली. दरम्यान तालुक्यातील पूर्णा परिसरातील इताडकरवाडी येथील व्यापारी संकुलात असलेल्या गोदामावर छापा (illegal flammable chemical seized) टाकून १ कोटी ८० लाख रुपयांचे अवैध ज्वलनशील रसायन जप्त केले आहे.

Illegal Chemical Stock Seized
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 6:56 PM IST

ठाणे Illegal Chemical Stock Seized: या गोदामात विनापरवाना लोखंडी आणि प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये रसायनाचा साठा करण्यात आला होता. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर केमिकल माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. २०७ लोखंडी ड्रम, ९६७ प्लास्टिक ड्रममध्ये ठेवलेले केमिकल जप्त केले गेले. भिवंडीतील गोदाम बहुल परिसरात असलेल्या केमिकलच्या गोदामांवर पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. याच मालिकेत नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल बढे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केमिकलच्या गोदामावर छापा टाकला.

Illegal Chemical Stock Seized
पाईपच्या साहय्याने टॅंकरमधून ड्रममध्ये केमिकल ओतताना

रसायने अतिज्वालाग्राही: ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता पूर्णा गावात श्री कॉम्प्लेक्स स्थित जय अंबे कंपनीच्या तीन गोदामांवर छापा टाकून १ कोटी ८० लाख २७ हजार ५१६ रुपयांचा अतिज्वालाग्राही रसायनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या छाप्या दरम्यान जीजे १२ सिटी ९२५३ या क्रमांकाच्या टँकरमधून हे केमिकल प्लास्टिक आणि लोखंडी ड्रममध्ये रिकामे केले जात होते. या काळात पोलिसांनी २०७ लोखंडी ड्रम आणि ९६७ प्लास्टिक ड्रममध्ये ठेवलेले केमिकल जप्त केले.

गुजरातमधून रसायनाची आयात: अवैध रसायने गुजरातमधून आणली असल्याचे आढळून आले. या गोदामांमध्ये केमिकलच्या सुरक्षेसाठी कोणतेही नियोजन नव्हते. तसेच त्यांचा साठा करण्याची कोणतीही परवानगी नव्हती. गोदाम मालकाने प्रशासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलीस संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिसांनी देवेंद्र पाल याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता, पर्यावरण संरक्षण कायदा, पेट्रो केमिकल कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. राजा पाटील आणि टँकर चालक कुमरान कुमार यांच्यावर घातक रसायन निर्मिती, साठवणूक आणि आयात नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास करत असलेले सपोनि विठ्ठल बढे यांनी सांगितले की, जप्त केलेल्या साठ्यामध्ये २५ प्रकारची वेगवेगळी रसायने गुजरातमधून आणली असल्याचे आढळून आले आहे.

हजारो नागरिकांचा जीव धोक्यात: भिवंडीत पूर्णा, काल्हेर, दापोडा, कशेळी, राहनाळ, अंजूरफाटा, माणकोली आणि वलगाव आदी गोदाम परिसरात २५ हजारांहून अधिक गोदामे आहेत. ज्यामध्ये अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक रसायनांचा मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या साठा केला जातो. या गोदामांमध्ये अग्निसुरक्षेची साधने व उपाययोजना इत्यादी नाहीत. अशा प्रकारे शेकडो केमिकल गोदामांना आग लागण्याच्या घटना नेहमीच घडतात. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. काही वेळा कामगारांनाही जीव गमवावा लागतो. याबाबत गोदाम परिसरातील रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही घातक रसायनाची गोदामे इतरत्र हलवली जात नाहीत. त्यामुळे अत्यंत ज्वलनशील रासायनिक गोदामांजवळ राहणाऱ्या हजारो नागरिकांचा जीव नेहमीच धोक्यात असतो.

हेही वाचा:

  1. Nashik Drug Racket : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, नाशिकमधील फॅक्टरीतून ३०० कोटींचं ड्रग्ज जप्त
  2. Drugs Factory Destroyed : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाचा ड्रग्ज कारखाना उध्वस्त; १३५ किलो एम डी ड्रग्ज जप्त
  3. Eight Crores Gold Seized : अबब...! मुंबईहून तस्करी होणारे आठ कोटी रुपयांचं सोनं जप्त, दोन तस्करांची चौकशी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.